जायखेड्यात रस्त्यावर फिरणाऱ्यांना समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 08:37 PM2020-03-26T20:37:08+5:302020-03-26T23:11:06+5:30
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जायखेड्यासह परिसरातील अनेक गावात लॉकडाउन झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करताच जायखेड्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वच बंद होईल या भीतीने नागरिकांनी किराणा माल खरेदीसाठी दुकानांवर गर्दी केली होती.
जायखेडा : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जायखेड्यासह परिसरातील अनेक गावात लॉकडाउन झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करताच जायखेड्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वच बंद होईल या भीतीने नागरिकांनी किराणा माल खरेदीसाठी दुकानांवर गर्दी केली होती. मात्र यानंतर अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू दिसल्याने हा गैरसमज दूर झाला. अन्य व्यावसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवल्याने आजही सर्वत्र शुकशुकाट होता. दरम्यान संचारबंदीचे उल्लंघन करणाºया काही दुकानदारांवर जायखेडा पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर जमावबंदी असतानाही रस्त्यावर विनाकारण फिरणाºयांना समज देण्यात आली आहे. कुल्फी, आइस्क्र ीम व शीतपेये विक्र ी करणाºया काही किराणा दुकानदारांवर ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी कारवाई करीत माल जप्त केला. तर चढ्याभावाने किराणा माल विकणाºया दुकानदारांना ग्रामपंचायतकडून कडक ताकीद देण्यात आली.
प्रत्येकाने स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी व गर्दी टाळावी, असे आवाहन सरपंच शांताराम अहिरे यांनी केले.
नियम मोडणाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, कोरोनासारख्या संकटाचे गांभीर्य ओळखून सर्वांनी नियमांचे पालन करावे व राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जायखेडा येथील मस्जिद बंद करण्यात आली असून, मुस्लीम समाजानेही मस्जिदीत नमाज न पढण्याचा निर्णय घेतला आहे, तर जुम्मा नमाजही घरीच करावी, असे आवाहन मुस्लीम पंच कमिटीने केले आहे.