भूमिगत गटार योजनेचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:20 AM2018-05-14T00:20:06+5:302018-05-14T00:20:06+5:30

देवळाली छावणी परिषद प्रशासन व नगरसेवकांच्या नियोजनशून्य कारभारामुळे लॅमरोडला लागूनच असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर रस्त्यावरील भूमिगत गटार योजनेचे काम वर्षभरापासून रखडून पडले आहे.

 Undertaking underground drainage scheme | भूमिगत गटार योजनेचे काम रखडले

भूमिगत गटार योजनेचे काम रखडले

Next

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषद प्रशासन व नगरसेवकांच्या नियोजनशून्य कारभारामुळे लॅमरोडला लागूनच असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर रस्त्यावरील भूमिगत गटार योजनेचे काम वर्षभरापासून रखडून पडले आहे. मुख्य रस्ता फोडून भूमिगत गटारीचे पाइप टाकण्यात आले. मात्र उर्वरित काम मंजूर नसल्याने फोडलेल्या रस्त्यावर दिवसभर धूळ उडत असल्याने परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा आजार जडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.  देवळाली छावणी परिषद हद्दीतील आठही वॉर्डांमध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. छावणी प्रशासन, नगरसेवकांमधील समन्वयाचा अभाव व नियोजनशून्य कारभारामुळे भूमिगत गटार योजनेचे काम रखडले असून, अर्धवट स्थितीत आहे. वॉर्ड क्रमांक ४ मधील लॅमरोडलगत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर मुख्य रस्त्यावर भूमिगत गटार योजनेचे पाइप टाकण्यासाठी गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी मधोमध खोदाई करून पाइप टाकण्यात आले होते. त्यानंतर पावसाळ्यात रस्ता खोदाईमुळे सर्वत्र चिखल साचत असल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागले. यामुळे रहिवासी प्रचंड त्रस्त झाले होते.
श्वसनाच्या  आजाराची शक्यता
श्री महालक्ष्मी मंदिर रस्ता वर्षभरापासून भूमिगत गटारीच्या अर्धवट कामामुळे फोडून ठेवला आहे. यामुळे दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. छोटी-मोठी वाहने गेल्यास जास्त प्रमाणात धूळ उडते. या धुळीमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले असून, त्यांना श्वसनाच्या आजाराची लागण होण्याची दाट शक्यता आहे. तोंडावर पावसाळा येऊन ठेपल्याने रहिवाशांमध्ये येण्या-जाण्याबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Undertaking underground drainage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक