रेड झोनमध्येही दैनंदिन व्यवहार पूर्ववत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:00 PM2020-05-21T22:00:15+5:302020-05-21T23:32:46+5:30
नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा शुक्रवारपासून सुरू होत असून, त्यासाठी नवीन नियमावली ठरवून देण्यात आलेली असली तरी, प्रामुख्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्ववतच राहणार असून, दुकाने, विविध व्यवसाय याकाळात सुरू राहतील. मात्र सायंकाळनंतर संचारबंदी कायम राहणार असून, नागरिकांना पूर्वीप्रमाणेच त्याचे पालन करावे लागणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पाहता राज्य सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करताना आता रेड झोन व नॉन रेड झोन असे दोनच झोन ठेवले आहेत. नॉन रेड झोनमध्ये सर्व सुविधा व सेवा सुरळीत ठेवण्याची मुभा देण्यात आली असली तरी, रेड झोनमध्ये मात्र काही निर्बंध कायम आहेत. चौथ्या टप्प्याचे लॉकडाउन घोषित करताना शासनाने काही नियमावली तयार केली आहे. नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्राचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आल्याने व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना असल्याने पूर्वीप्रमाणेच शहरात संचारबंदी जारी होऊन सर्व प्रकारची दुकाने, व्यवसाय बंद राहतील की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांमध्ये त्याबाबतचा संभ्रमही कायम होता. दुकाने बंद राहण्याच्या भीतीने खरेदीसाठी नागरिकही मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले. नागरिकांमध्ये लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याबाबत असलेला संभ्रम पाहता, त्या संदर्भात शासनाने स्पष्टीकरण जारी केले.
----------------------------
३ मेनंतर लॉकडाउन व संचारबंदीतून ज्या व्यवसायांना, व्यापाराला सूट देण्यात आली ती सूट यापुढच्या काळातही कायम ठेवण्यात येणार आहे. विशेष करून अत्यावश्यक सेवांबरोबरच सर्व प्रकारची दुकाने, लहान-मोठे व्यवसाय, खासगी, शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू ठेवण्याची मुभा आहे.