बँक ऑफ बडोदाचे आर्थिक व्यवहार पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 10:54 PM2021-03-24T22:54:13+5:302021-03-25T00:54:30+5:30
लोहोणेर : येथील गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बडोदा बँक शाखेचे आर्थिक व्यवहार नेटवर्क खंडित असल्याने ठप्प झाले होते. स्थगित झालेले कामकाज पूर्ववत सुरू केल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली.

ग्राहकांना नाहक तासन् तास ताटकळत बसावे लागत असल्याने ग्राहक चांगलेच वैतागले होते. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने नेटवर्क सुरळीतपणे सुरू करावे म्हणून शाखाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. आणि त्याची तातडीने दखल घेत बँक ऑफ बडोदा बँकेने आपली नेटवर्क सुविधा सुरळीत सुरू करून आर्थिक व्यवहार पूर्ववत करीत बँक सेवा नागरिकांसाठी सुरू केली.
यानिमित्ताने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने बँक ऑफ बडोदाचे आय.टी. सेलचे अधिकारी प्रमोद गौतम, सटाणा शाखेचे मुख्य प्रबंधक सुबोध कुमार, लोहोणेर शाखेचे शाखा प्रबंधक चंदन कुमार, अशोककुमार पटनायक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक देशमुख, रमेश आहिरे, मनोज देशमुख, अदित्य शेवाळे, पंकज शेवाळे, गणेश देशमुख, संजय भदाणे, ओमकार तिसगे, गौरव परदेशी तसेच कर्मचारी हिरामण अहिरे, विश्वास शेवाळे, दरबारसिंग गिरासे आदी उपस्थित होते.