बेरोजगारांची बारा लाखांची फसवणूक

By admin | Published: February 20, 2017 10:58 PM2017-02-20T22:58:21+5:302017-02-20T22:58:40+5:30

आमिष : मंत्रालयात ओळख असल्याची बतावणी

Unemployed 12 lakh cheating | बेरोजगारांची बारा लाखांची फसवणूक

बेरोजगारांची बारा लाखांची फसवणूक

Next

नाशिक : मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत एलआयसी व एमएसव्हीई कार्पोरेशनमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अमरावती येथील संशयित अभिजीत ग. काळमेघ (३२ रा. योगीराज कॉलनी, तपोवन विद्यापीठ, अमरावती) याने बेरोजगारांना बारा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, यामध्ये अनेक बेरोजगार तसेच फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे़  प्रदीपसिंग उत्तमसिंग ओनावळे (थर्मल पॉवर स्टेशन, सामनगाव, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१५ मध्ये त्यांची पुतणी व इतर बेरोजगारांशी काळमेघची भेट झाली़ त्याने मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून एलआयसी तसेच एमएसव्ही कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले़ त्यानुसार या बेरोजगारांनी त्यास नोकरीसाठी १२ लाख रुपये दिले़ मात्र सांगितलेला कालावधी उलटूनही नोकरी न मिळाल्याने तसेच दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने ओनावळे यांनी न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता़  या दाव्यावर न्यायालयामध्ये नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन
संशयित काळमेघ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते़ त्यानुसार नाशिकरोड पोलिसानी संशयित अभिजित काळमेघविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)
पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र खेचले
नाशिक : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास नाशिकरोडच्या मोटवाणी रोडवर घडली़ उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती दीपक श्रोत्रिय (५६, रा़ अनुबंध सोसायटी, सिंहगडरोड, पानमळा, पुणे) या सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोटवाणीरोडवरील उत्सव मंगल कार्यालयाकडून पायी जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ या प्रकरणी श्रोत्रिय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Unemployed 12 lakh cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.