अर्थमुव्हर्स संघटनेचे सदस्य झाले बेरोजगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:58+5:302021-08-22T04:16:58+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अर्थमुव्हर्स संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य कोरोनामुळे बेरोजगार झाले असून, बँक अगर फायनान्स कंपनीने जप्तीची कार्यवाही थांबवावी, ...

Unemployed became members of Earthmovers Association! | अर्थमुव्हर्स संघटनेचे सदस्य झाले बेरोजगार !

अर्थमुव्हर्स संघटनेचे सदस्य झाले बेरोजगार !

Next

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अर्थमुव्हर्स संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य कोरोनामुळे बेरोजगार झाले असून, बँक अगर फायनान्स कंपनीने जप्तीची कार्यवाही थांबवावी, या मागणीचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदारांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उदरनिर्वाहासाठी संघटनेचे सदस्य जेसीबी, पोकलेन, ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर आदी घेऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचे सपाटीकरण करणे, काही ठिकाणी मातीचा भराव टाकून जमिनीची लेव्हलिंग करणे, अशी कामे करतात. त्यातून सर्वांचे उदरनिर्वाह होत असते. हे सुशिक्षित बेरोजगार फक्त स्थानिक शेतकरी यांच्या डोंगर उताराच्या नापीक शेतजमिनीचे सुपीक जमिनीमध्ये रूपांतर करण्यासाठी सपाटीकरण करणे व खड्डा असेल तर माती भरून सपाटीकरण करणे वगैरेची कामे करतात; पण गेल्या दोन वर्षांपासून ही कामे कोरोनामुळे बंद पडली आहेत. बँक व फायनान्स कंपन्याचे हप्ते थकले आहेत. न्यायालयामार्फत जप्तीच्या नोटिसा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बँक व फायनान्स कंपन्या यांना सबुरीचे आदेश देऊन आमच्यावर होणारी बँक अगर फायनान्स कंपनीने जप्तीची कार्यवाही थांबवावी, असे शासकीय आदेश देण्याबाबत निवेदन दिले आहे.

निवेदनावर संपत बोडके, नवनाथ कोठुळे, पप्पू कडलग, सुरेश नायकर, योगेश शिरसाट, पिंटू पोरजे, अंकुश बोडके, सुनील मेढे, भावडू मेढे, माणिक बोडके, भाऊसाहेब महाले, नितीन सकाळे, दत्ताभाऊ बोडके, भाऊसाहेब बोडके, रोशन बोडके, तानाजी बोडके, विजय होन, संतोष महाले, सचिन चव्हाण, गणेश महाले, बाळासाहेब शिरसाट, पंढरीनाथ शिरसाट, धोंडीराम मोरे, संदीप बोडके, पांडुरंग वाकसरे, तानाजी चोथे, प्रभाकर मुळाणे, मधू मुळाणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Unemployed became members of Earthmovers Association!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.