बेरोजगार अभियंता संघटनेची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:14+5:302021-07-29T04:14:14+5:30
महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या नाशिक जिल्ह्याची बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निसर्गराज सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.२७) झाली. बैठकीत संघटनेच्या अडचणींबाबत चर्चा ...
महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या नाशिक जिल्ह्याची बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निसर्गराज सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.२७) झाली. बैठकीत संघटनेच्या अडचणींबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकामसह इतर विभागात कामे मिळविण्यापासून ते कामांची बिले काढण्यापर्यंत इंजिनिअर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या भावना इंजिनिअर्सनी व्यक्त केल्या. कामांचे वाटप करताना ३३:३३:३४ या सूत्राचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना संघटनेचे पत्र दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेतील कामांच्या फाइल प्रवास कमी करण्यावरही चर्चा झाली. तसेच यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बैठक घेण्यात येणार असल्याचे सरचिटणीस विनायक माळेकर यांनी सांगितले. संघटनेच्या अडचणींबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचाही निर्णय झाला. संघटनेचे संस्थापक योगेश कासार पाटील, जिल्हाध्यक्ष सोनवणे यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा यावेळी केली. माळेकर यांना पदोन्नती देत सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली, तर संदीप वाजे यांची खजिनदारपदी निवड झाली. बैठकीस आर. टी. शिंदे, विजय घुगे आदी उपस्थित होते. चंद्रशेखर डांगे यांनी सूत्रसंचालन केले.
...............
चौकट==
नूतन जिल्हा कार्यकरिणी
मिलिंद सैंदाणे (कार्याध्यक्ष), अनिल आव्हाड (मुख्य संघटक), संजय पवार, प्रशांत देवरे, अनिल दराडे, चंद्रशेखर डांगे (उपाध्यक्ष), अजित सकाळे, सागर विंचू, रियाज शेख, अमोल पगारे, अमोल मोरे (सचिव), मुराद शेख, अल्पेश शहा, संजय कडन्नोर, संग्राम देशमुख, नितीन आगळे, महेंद्र भोये (संघटक).
(फोटो २७ संघटना)