‘किसान पत्रकार’ नावाने बेरोजगारांना गंडा; राज्यात अनेक घटना

By admin | Published: March 4, 2017 01:19 AM2017-03-04T01:19:51+5:302017-03-04T01:20:03+5:30

नाशिक : भारत सरकारच्या दूरसंचार केंद्राच्या नावाचा वापर करीत, सरकारच्याच किसान चॅनलसाठी ‘किसान पत्रकार’ म्हणून नेमणूक करण्यासाठी राज्यातील बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला

'Unemployed' by the name 'Kisan Journalist'; Many incidents in the state | ‘किसान पत्रकार’ नावाने बेरोजगारांना गंडा; राज्यात अनेक घटना

‘किसान पत्रकार’ नावाने बेरोजगारांना गंडा; राज्यात अनेक घटना

Next

नाशिक : भारत सरकारच्या दूरसंचार केंद्राच्या नावाचा वापर करीत, सरकारच्याच किसान चॅनलसाठी ‘किसान पत्रकार’ म्हणून नेमणूक करण्यासाठी राज्यातील बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून, नियुक्तीच्या नावाखाली संबंधितांकडून हजारो रुपयांची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे उमेदवारांच्या घरी नियुक्तिपत्र पाठवून पैशांची मागणी होत असल्याने त्यावर विश्वास ठेवणाऱ्या बेरोजगारांना गंडविण्याचा नवीन फंडा भामट्यांनी अवलंबिला आहे.
नाशिक शहरातील काही बेरोजगार तरुणांना ‘किसान पत्रकार’ म्हणून नियुक्तीचे पत्रे थेट घरी पोहोचल्याने त्याची खात्री करण्याचा काहींनी प्रयत्न केला असता, त्यातून हा प्रकार लक्षात आला आहे. डी. डी. किसान चॅनलच्या लेटरहेडवर २०१६ ते २०५६ अशा तीस वर्षासाठी किसान पत्रकार म्हणून सरकारी नोकरी देण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. वर्षाकाठी तीन लाख, ९० हजार व महिन्याला ३२ हजार ५०० रुपये असे वेतनही ठरविण्यात आले असून, या पत्रावर संचालक सीमा शर्मा यांची स्वाक्षरी आहे. या नियुक्तिपत्रासोबतच किसान चॅनल विषयी माहिती देताना संपूर्ण देशात २४९२ पदे भरण्यात येणार असून, महाराष्ट्रात २२० पदे आहेत. त्यासाठी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असण्याची अट घालण्यात आली आहे.
ज्या उमेदवारांची पत्रकार म्हणून निवड करण्यात आली, त्यांना नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी १३ हजार ७५० रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक करण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत डिमांड ड्राफ्ट अथवा धनादेशाने ही रक्कम घेतली जाणार नाही, तर फक्त बॅँक खात्यात रोख रक्कमच जमा करण्याची सक्ती केली आहे. नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे उमेदवार पैसे जमा करणार नाहीत, त्यांची नियुक्ती त्याच दिवशी रद्द केली जाणार असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. अनामत रक्कम जमा करण्यासाठी ०७८३८९७४९०५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Unemployed' by the name 'Kisan Journalist'; Many incidents in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.