यंत्रमाग कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 01:15 AM2021-05-22T01:15:50+5:302021-05-22T01:18:46+5:30

राज्यात कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध लावण्यात आल्याने सारे जनजीवन ठप्प झाले आहे. त्याचा फटका सामान्य कामगारांना बसत असून,  शहरातील यंत्रमागदेखील गेल्या महिना भरापासून बंद असल्याने लाखो यंत्रमाग कामगारांची उपासमार होत आहे.  

Unemployment ax on machine spinning workers | यंत्रमाग कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

यंत्रमाग कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

Next
ठळक मुद्देआर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी

शफीक शेख / मालेगाव :  राज्यात कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध लावण्यात आल्याने सारे जनजीवन ठप्प झाले आहे. त्याचा फटका सामान्य कामगारांना बसत असून,  शहरातील यंत्रमागदेखील गेल्या महिना भरापासून बंद असल्याने लाखो यंत्रमाग कामगारांची उपासमार होत आहे.  
 शहरात सुमारे एक ते दीड लाख कामगार काम करतात.  यंत्रमागावर त्यांना दर आठवड्याला मजुरी मिळते.  मात्र कडक निर्बंधांमुळे शहरातील यंत्रमागांचा खडखडाट बंद झाला असून, लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांना भाजीपाला विकणे, रसवंती चालवणे अशी इतर कामे शोधावी लागत आहेत. झोपडपट्ट्यामध्ये आधीच दारिद्र्यात खितपत पडलेल्या यंत्रमाग मजुरांचे हाल होत असल्याने राज्य शासनाने त्यांच्या बँक खात्यावर पैसे  टाकून आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. निर्बंधांमुळे स्पिनिंग मिल्स बंद आहेत.  त्यामुळे  प्रकिया करण्यासाठी देशभरात पाली, बालोतरा अहमदाबाद , सुरत येथे माल विकला जातो.  तामिळनाडू, केरळ, कर्नाटक येथेही माल जातो, मात्र बंदमुळे तेथे माल  पाठविता आलेला नाही.   रिटेल मार्केटही बंद असल्याने माल घ्यायला कुणी तयार नाही.  
काही यंत्रमाग धारकांनी ५० टक्के कामगारांना घेऊन यंत्रमाग सुरू करण्याचा प्रयत्न केला.
न घरका, ना घाटका....
n सव्वा लाख यंत्रमाग कामगार बेकार झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. यंत्रमाग चालकांनी रमजान ईदनिमित्त कामगारांना बोनस दिला. काही प्रमाणात उचलदेखील दिली.  
n काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. मात्र हातांना काम 
नसल्याने यंत्रमाग कामगारांची अवस्था ‘न घरका ना घाटका’ अशी 
झाली आहे. 
n राज्य शासनाने रेशनिंगचे धान्य वाढवून यंत्रमाग मजुरांना मदत करावी. शासनाबरोबरच श्रीमंत नागरिकांनी त्यांना आर्थिक मदत करावी. 

Web Title: Unemployment ax on machine spinning workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.