अंबोली शाळेस युनेस्कोचे सदस्यत्व बहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 09:55 PM2019-10-08T21:55:50+5:302019-10-08T21:56:16+5:30
त्रंबकेश्वर : तालुक्यातील जिल्हा परिषद अंबोली शाळेस युनेस्को क्लब आँफ जिल्हा परीषद प्रायमरी स्कूलचे सदस्यत्व मिळाले असून यामुळे शाळेची गुणवत्ता वाढीसाठी व प्रगत शाळा करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यासाठी मदत मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युनेस्कोचे सदस्यत्व मिळवणारी पहीली शाळा हा बहुमान मिळाला आहे.
त्रंबकेश्वर : तालुक्यातील जिल्हा परिषद अंबोली शाळेस युनेस्को क्लब आँफ जिल्हा परीषद प्रायमरी स्कूलचे सदस्यत्व मिळाले असून यामुळे शाळेची गुणवत्ता वाढीसाठी व प्रगत शाळा करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यासाठी मदत मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युनेस्कोचे सदस्यत्व मिळवणारी पहीली शाळा हा बहुमान मिळाला आहे.
युनेस्को संकुलाचे आंतरराष्ट्रीय जनरल सेक्र ेटरी धीरेंद्र भटनागर यांनी शाळेला सदस्यत्व बहाल केले. शाळा उच्च प्राथमिक शाळेत एकूण ८ शिक्षक कार्यरत असून ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी सामान्य कुटूंबातील आहेत. सर्व प्रवर्गातील विद्यार्थी या शाळेत शिकतात. शाळेचे उपक्र मशिल शिक्षक जयेशकुमार कापडणीस व इतर सर्व शिक्षकवृंद यांच्या प्रयत्नाने शाळेत नवनविन उपक्र म राबविले जातात.या युनेस्कोच्या सदस्यत्वाने शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा जडला गेला आहे.
शाळेचा विकास, गुणवत्तेचा ध्यास घेतलेले हे शिक्षक असल्यामुळे अजून त्यांच्या उपक्र मशिलतेला यामुळे वाव मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्येरराष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी. तसेच आंतरराष्ट्रीय समस्यांची जाणिव व्हावी. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राथमिक शिक्षण व त्यावरील विविध प्रयोग याबाबतचे आदान प्रदान व्हावे हा या मागील उद्देश असून विविध आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करण्याची संधी यामार्फत मिळणार आहे.
क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना युनेस्कोच्या कल्चरल एक्सचेंज व स्टडी टूर कार्यक्र मांतर्गत दूसऱ्या देशात जावून आपली संस्कृती, कला सादर करण्याची व इतर देशातील संस्कृती अनुभवण्याची तसेच आंतरराष्ट्रीय काँन्फरन्स व स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे.
मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. वैशाली वीर गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाठ, शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद चव्हाण, केंद्रप्रमुख जयश्री पाटील व मुख्याध्यापक सरला मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या युनेस्को सदस्यत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच अंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, गावचे पोलीस पाटील व पालकवर्गाने स्वागत केले आहे.
डिजिटल तंत्रज्ञान तसेच ज्ञानरचनावाद सारख्या विविध प्रणालींचा वापर करून जिल्हा परीषद शिक्षक जीव ओतुन काम करत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा पटाचा आलेख वाढतोय. अनेक साहित्यांचा अध्यापनात वापर करून त्याची तंत्रज्ञानशी सांगड घातली जातेय. यामुळे शाळेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्र मांत सहभागी कसे होतील यासाठी प्रयत्नशील राहू.
- जयेशकुमार कापडणीस, शिक्षक.
या अगोदर शाळेने अनेक नवोपक्र म राबवून शाळेचा नावलौकीक वाढवला आहे. विद्यार्थी विविध स्तरावर पुढे जावेत यासाठी शाळा, सर्व शिक्षक प्रयत्नशील आहेत. या सदस्यत्वामुळे अंबोली केंद्र शाळेला एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. याचा नक्कीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी उपयोग होईल.
- जयश्री पाटील, केंद्रप्रमुख.