स्त्रीच्या भावविश्वाचे विविध पैलू उलगडणारे ‘नागमंडळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:53 AM2018-11-27T00:53:37+5:302018-11-27T00:53:51+5:30
पत्नीसोबत संबंध न ठेवताही तिला दिवस गेल्याचे कळल्यानंतर पत्नीला अग्निदिव्यात लोटणारा पती आणि पतीने अग्निदिव्य करायला सांगितल्यानंतर आपले पावित्र्य सिद्ध करणाऱ्या पत्नीची कथा ‘नागमंडळ’ नाटकातून नाशिककरांना पहायला मिळाली.
राज्य नाट्य स्पर्धा
नाशिक : पत्नीसोबत संबंध न ठेवताही तिला दिवस गेल्याचे कळल्यानंतर पत्नीला अग्निदिव्यात लोटणारा पती आणि पतीने अग्निदिव्य करायला सांगितल्यानंतर आपले पावित्र्य सिद्ध करणाऱ्या पत्नीची कथा ‘नागमंडळ’ नाटकातून नाशिककरांना पहायला मिळाली.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सोमवारी (दि.२६) नाशिकच्या एस. एम. एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फाउंडेशनतर्फे गिरीश कर्नाड लिखित नाटकाचे सादरीकरण केले. यात राणी नावाची मुलगी विवाहानंतर नवरा तिच्याशी संबंध ठेवत नाही. म्हणून मुळी पतीला उगाळून खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. परंतु मुळीचे द्रावन फेकून द्यावे लागते. फेकलेले द्रव नागाच्या अंगावर पडून नाग राणीच्या प्रेमात पडल्यामुळे तिच्या नवºयाचे रूप धारण करून तिच्या घरात शिरतो. त्यानंतर नागाच्या आणि राणीच्या प्रेमसंबंधातून राणीला दिवस जातात. ही गोष्ट राणीच्या खºया नवºयाला कळल्यानंतर तो राणीला सर्व गावासमोर अग्निदिव्य करायला सांगतो. परंतु, या अग्निदिव्यात नाग तिला मदत करतो. त्यामुळे राणी गावकºयांसमोर तिचे पावित्र्य सिद्ध करते. दिग्दर्शक रोहित पगारे यांनी स्त्रीच्या भावविश्वातील विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकात तेजस्वी देव, नीलेश राजगुरू, रोहित पगारे, राहुल बर्वे, ऋषिकेश बोडके यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नेपथ्य नीलेश राजगुरू, प्रकाश योजना रवींद्र रहाणे, पार्श्वसंगीत राहुल कानडे, रंगभूषा समीक्षा निकम व वेशभूषा माणिक कानडे यांची होती.
आजचे नाटक- नाटक : ‘तिरथ मे तो पानी हैं’ वेळ : सायंकाळी ७ वाजता.