शंभरफुटी रस्त्याचे काम अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:39 AM2018-04-05T00:39:27+5:302018-04-05T00:39:27+5:30
वडाळागावातील महापालिकेचे रु ग्णालय ते श्रीराम कॉलनीपर्यंतच्या शंभरफुटी रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
इंदिरानगर : वडाळागावातील महापालिकेचे रु ग्णालय ते श्रीराम कॉलनीपर्यंतच्या शंभरफुटी रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणे महामार्गाला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून राजीवनगर, कलानगर, वडाळागाव, डीजीपीनगर क्र मांक-१ आदीमार्गे शंभरफुटी रस्ता तयार करण्यात आला. परंतु पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याच्या मधोमध आणि दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्यांमुळे या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत पडून आहे. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. त्याची अखेर दोन महिन्यांपूर्वी महापा लिकेच्या अतिक्र मण विभागाने दखल घेत सुमारे साडेचारशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या. काही दिवसांतच या रस्त्याचे काम सुरू केले परंतु तेसुद्धा अर्धवट स्थितीत पडून आहे. दहा वर्षांपासून मनपाचे रु ग्णालय ते श्रीराम कॉलनीसमोर असलेल्या शंभरफुटी रस्त्याचे काम अद्याप अर्धवट स्थितीत पडून आहे. कारण संबंधित मालकाकडून जमीन घेण्यास मनपा अद्याप असमर्थ ठरत आहे . त्यामुळे पन्नासफुटीच रस्ता तयार करण्यात आला आहे. उर्वरित पन्नासफुटी रस्ता तयार करण्यात न आल्याने संबंधित ठिकाणी दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी टेम्पोने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटनाही घडली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.