अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:09 AM2018-11-01T02:09:44+5:302018-11-01T02:09:58+5:30

जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात कारवाई केली असली तरी हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकांनी केला आहे. अर्जामध्ये खोटी माहिती भरूनही संबंधितांवर अत्यंत सौम्य कारवाई केल्याने आता अन्यायग्रस्त शिक्षकांनी पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

 Unforeseen and displaced teachers again hunger strike | अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

Next

नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात कारवाई केली असली तरी हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकांनी केला आहे. अर्जामध्ये खोटी माहिती भरूनही संबंधितांवर अत्यंत सौम्य कारवाई केल्याने आता अन्यायग्रस्त शिक्षकांनी पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.  नाशिक जिल्हा विस्थापित शिक्षक व आंतरजिल्हा बदली कृती समितीची बैठक अध्यक्ष सुभाष अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षक बँक सभागृह येथे झाली. यावेळी शिक्षकांनी आपणाला अद्यापही न्याय मिळाला नसल्याने अत्यंत खडतर सेवा करावी लागत असल्याचे आणि चुकीची माहिती भरूनही सोयीच्या ठिकाणी ते काम करीत आहेत. जिल्हा परिषदेने या संदर्भातील निर्णय घेताना सोयीचे अर्थ आणि नियम लावून निर्णय घेतले आहेत. यामुळे तक्रार करणाºयांना शिक्षा आणि ज्यांच्याविरुद्ध तक्रारी आहेत त्यांच्याविषयी मवाळ भूमिका घेण्यात आल्यामुळेच शिक्षक बदल्यांमधील अनियमितता कायम असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.
२०१८ मधील रॅन्डममधील शिक्षकांना व पतीपत्नी एकत्रीकरण करावे यासाठी १२ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टीत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बदल्या होऊनही बदलीची, संवर्गनिहाय यादी अद्याप प्रकाशित करण्यात आलेली नाही. बदलीसाठी आॅनलाइन खोटी माहिती भरून, खोटे अपंग प्रमाणपत्र, विवाहित असूनही अविवाहित, पुनर्विवाह होऊन घटस्फोटित, पक्षघातसारखी बोगस माहिती शिक्षकांनी भरलेली आहे. त्यांच्यावर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीही गैरसोयीच्या बदल्या सोयीच्या कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या पूर्वीही विस्थापित शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बारा दिवस साखळी उपोषण व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. आता पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती सुभाष साइनकर, अनिल वाडेकर, अर्चना धोंडगे, मंगला मोरे अशा एकूण २३ शिक्षकांच्या स्वाक्षºया आहेत.
खोटी माहिती भरणाºया शिक्षकांची त्रयस्थ पथकाकडून नव्याने शारीरिक तपासणी करावी व दोषी असणाºया शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करून रॅन्डम शिक्षकांना त्या जागी पदस्थापना द्यावी, खोटी माहिती भरणाºया शिक्षकांना प्रोत्साहन देऊन गैरव्यवहार करून पाठीशी घालणाºयांची चौकशी करून सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title:  Unforeseen and displaced teachers again hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.