देवळे शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 05:08 PM2018-10-28T17:08:23+5:302018-10-28T17:08:39+5:30

घोटी : देवळे ता. इगतपुरी शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.हा मृतदेह साधारणत: पाच ते सहा दिवसांचा असावा असा अंदाज वैद्यकीय अधिका-यांनी दिला आहे. देवळे खैरगाव रस्त्यावर एका निर्जनस्थळी एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती खैरगाव येथील माजी सरपंच अनिल परदेशी यांनी घोटी पोलीसाना स्टेशनला दिली.

An unidentified body was found in Devle Shivaraya | देवळे शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

देवळे शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

Next
ठळक मुद्देघात की अपघात?पोलीस संभ्रमात

घोटी : देवळे ता. इगतपुरी शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.हा मृतदेह साधारणत: पाच ते सहा दिवसांचा असावा असा अंदाज वैद्यकीय अधिका-यांनी दिला आहे. देवळे खैरगाव रस्त्यावर एका निर्जनस्थळी एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती खैरगाव येथील माजी सरपंच अनिल परदेशी यांनी घोटी पोलीसाना स्टेशनला दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक आनंदा माळी विलास घिसाडी यांसह पोलीस हवालदार धर्मराज पारधी,रविराज जगताप यांनी मृतदेह ताब्यात घेत जागेवरच उत्तरीय तपासणी करून दफन करण्यात आले.वैद्यकीय अधिकार्यांच्या माहितीनुसार सदर इसमाचा पाच ते सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तिवली.सदर इसम सडपातळ बांधा रंगाने काळासावळा,अंगावर निळ्या रंगाचा फुल पॅन्ट,पांढर्या रंगाचा शर्ट त्यावर काळ्या रेषा,गोलगळ्याची भगवी बनियान पायात बाजारी रबरी प्लास्टिक चप्पल असल्याचे दिसून आले आहे. याबाबत कोणालाही अधिक माहिती असल्यास घोटी पोलीस ठाणे दूरध्वनी नंबर 02553 200544 या क्र मांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव,पोलीस हवालदार धर्मराज पारधी यांनी केले आहे.

Web Title: An unidentified body was found in Devle Shivaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.