नाशिक त्र्यंबक रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:10 PM2020-02-16T14:10:11+5:302020-02-16T14:10:54+5:30
त्र्यंबकेश्वर _- नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रविवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेने एक बिबट्या जागीच ठार झाला आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सरकारी वाहनातुन बिबट्यास उचलले आ िण त्यांच्या नाशिक येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात नेले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडुन बिबट्याचे शव विच्छेदन केले. यावेळी वाहनाची जोरदार धडक बसुनच बिबट्याचा मृत्यु झाल्याचे संबंधीत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
गेल्या पाच सहा महिन्यांपासुन संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत सुरु असल्याची चर्चा तालुकाभर ऐकु येत आहेत.आदिवासी शेतक-यावर हल्ला अनेक गायी, बैल, वासरे, बक-या, कुत्री यांचा फाडल्याच्या तक्र ारी येत होत्या. या परिसरात पिंजरे लावावेत अशी मागणी होत होती. पिंजरा लाउन बिबट्या जेरबंद केला असता तर किमान त्याचा जीव वाचला असता अशी चर्चा तालुक्यातुन होत आहे. अर्थात बिबटे एक होता की अनेक आहेत याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. (16टिबीके बिबट्या)