युनिफाइड डीसीपीआर; आज कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:25 AM2021-01-11T00:25:16+5:302021-01-11T00:26:09+5:30
बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल आणणाऱ्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली संदर्भात शंका-निरसनासाठी दि. ११ रोजी कालिदास कलामंदिर येथे सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल आणणाऱ्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली संदर्भात शंका-निरसनासाठी दि. ११ रोजी कालिदास कलामंदिर येथे सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेस यूडीसीपीआर तयार करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे नगरचना विभागाचे सेवानिवृत्त सहसंचालक प्रकाश भुक्ते, सहसंचालक अविनाश पाटील, पुणे महानगरपालिकेचे सुनील मरळे व सेवानिवृत्त उपसंचालक, नगररचना विभाग संजय सावजी यांचे सादरीकरण होणार आहे. ही कार्यशाळा निमंत्रीतांसाठीच असून, नगररचना विभाग तसेच मनपा, नगरपरिषद, नगरपंचायतमधील तांत्रिक कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेस क्रेडाई राष्ट्रीयचे सल्लागार जीतूभाई ठक्कर, कोषाध्यक्ष अनंत राजेगाकर, महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेचे नियोजन नाशिकर विभाग नगररचना सहसंचालक प्रतीभा भदाणे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले आहे. नगररचना विभागाचे राज्याचे संचालक सुधाकर नागनुरे, संचालक श्रीरंग लांडगे, नोरेश्वर शेंडे, निवृत्त संचालक राजन कोप, कमलाकर अकोडे आदि उपस्थित राहणार आहे.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांजि प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यशाळेस क्रेडाई राष्ट्रीयचे सल्लागार जितूभाई ठक्कर, क्रेडाई राष्ट्रीयचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नगररचना नाशिक विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे व क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन तसेच सर्व सभासद प्रयत्नशील आहेत.