पर्यावरण संतुलनासाठी प्लॅस्टिकबंदी करण्याचा एकमुखी ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:02+5:302021-08-23T04:17:02+5:30
सरपंच रूपाली पिंपळे, उपसरपंच अनिल शिरसाठ, ग्रामसेवक प्रकाश बाविस्कर यांच्यासह सदस्य दत्तू ठोक, सचिन शिरसाठ, रवींद्र शिंदे, पोपट शिरसाट, ...
सरपंच रूपाली पिंपळे, उपसरपंच अनिल शिरसाठ, ग्रामसेवक प्रकाश बाविस्कर यांच्यासह सदस्य दत्तू ठोक, सचिन शिरसाठ, रवींद्र शिंदे, पोपट शिरसाट, प्रकाश कदम, गोविंद माळी आदींसह गावातील ग्रामस्थांनी ऑनलाइन ग्रामसभेतील चर्चेत सहभाग घेतला. ऑनलाइन ग्रामसभेसंदर्भात गावात दवंडीबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक शेअर केली होती. घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन करणे, करवसुलीसंदर्भात
नागरिकांनी सहकार्य करणे, पाणीटंचाई कृती आराखडा, तयार जनसुविधा करण्याबरोबरच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे व उपाययोजना करणे आदी विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर जलजीवन मिशनअंतर्गत गावाचा कृती आराखडा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि समृद्ध लेबर बजेट तयार करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. दरम्यान, गावातील तंटे गावातच सोडवण्यासाठी तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते पोपट रामकृष्ण शिरसाठ आणि उपाध्यक्षपदी सुदाम शिवराम शिरसाठ यांची निवड करण्यात आली.
कोट...
ऑनलाइन ग्रामसभेसंदर्भात ग्रामस्थांचे सोशल मीडियाद्वारे प्रबोधन करण्यात आले होते. पहिलीच ऑनलाइन ग्रामसभा असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता होती. कुठल्याही अडथळ्याविना सकारात्मक चर्चा ग्रामसभेत झाली.
- अनिल शिरसाठ, उपसरपंच, मुसळगाव