केंद्रीय कृषिमंत्री घेणार नुकसानीची माहिती
By admin | Published: December 16, 2014 01:48 AM2014-12-16T01:48:04+5:302014-12-16T01:50:28+5:30
हरिश्चंद्र चव्हाण यांचे राधामोहन सिंग यांना निवेदन
नाशिक : जिल्'ातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत त्वरित पंचनामे होऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना दिले. सिंग यांनी यावर तत्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून नुकसानीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना दिले. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भेट घेऊन त्यांना राज्यातील व त्यातही नाशिक जिल्'ातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तत्पूर्वी खासदार गेल्या तीन ते चार दिवसापासून दिल्ली येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात आजारी होते. रुग्णालयातून सोडल्यानंतर खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जिल्'ात अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळींब,कांदा व अन्य फळबाग व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी उद््ध्वस्त झाल्याचे खासदार चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांचे पीककर्ज व वीजबिल तत्काळ माफ करून त्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी समीर चव्हाण, बापू गाडे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)