उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्र्यांना साकडेॅ
By admin | Published: September 6, 2015 10:33 PM2015-09-06T22:33:08+5:302015-09-06T22:34:04+5:30
सिन्नर : भाजपा, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिले
निवेदन; शिर्डी प्रवासात दुष्काळाचीच चर्चासिन्नर : तालुक्यात पर्जन्यमान घटल्याने यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळाशी लढा देण्यासाठी त्यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी भाजपा व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांना साकडे घातले.
केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री उपेंद्रसिंह कुशवाह, बिहार राज्याचे समता परिषदेचे अध्यक्ष सदानंज कुशवाह, बापूसाहेब भुजबळ, रवींद्र सोनवणे हे शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन नाशिककडे येत असताना वावी व सिन्नर येथे समता परिषद व भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वावी येथेही त्यांना दुष्काळी परिस्थितीची माहिती देण्यात आली. सिन्नर येथे बाळासाहेब हांडे, नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, गंगाधर वरंदळ, पद्माकर गुजराथी, भाऊसाहेब शिंदे, सविता कोठुरकर, नगरसेवक हर्षद देशमुख यांच्यासह समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली. तालुक्यात सलग चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी होत आहे. यावर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.
सरकारने दुष्काळी परिस्थितीचा विचार करून उपाययोजना राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पांडुरंग पाटोळे, रवि राजभोज, संदीप ढमाले, संजय काकड, डॉ. विष्णू अत्रे, राजेंद्र बलक, निवृत्ती पवार, डॉ. संदीप लोंढे, भाऊसाहेब पवार, संजय पवार, रामदास सोनवणे, राजाराम मुरकुटे, विजय पवार, कावेरी पवार, शोभा पवार, संध्या भगत, श्रीपाद लोणारे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)