दूरसंचार कंपनीचा अजब कारभार; कामगार, वाहनचालकांची सुरक्षा वाऱ्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:07 PM2020-03-05T17:07:06+5:302020-03-05T17:09:03+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील सुरत- शिर्डी राज्य महामार्गाच्या कडेला एअरटेल कंपनीच्या टॉवर लाईन टाकण्याचे काम सुरू आहे .मात्र सदर कामाच्या ठिकाणी कोणतेही ही बॅरिकेट अथवा काम सुरू असल्याचे फलक लावलेले नसल्याने कामगारांच्या व वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सदर रस्त्यावरील रहदारी लक्षात घेऊन शिर्डी-सुरत राज्य महामार्ग रस्त्याचे कोट्यवधी रु पये खर्च करून रु ंदीकरण व काँक्रि टीकरणही करण्यात आले. त्यामुळे हा रस्ता प्रशस्त झाला आहे. त्यामुळे वाहने भरधाव वेगाने धाऊ लागले आहेत. फक्त अंबिका नगर ते वणी चौफुली या ५०० मीटरच्या रस्त्याचे काम होणे रस्ता बाकी आहे . त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी व धुळीचे साम्राज्य आहे . या परिसरात रस्ता काम सुरु असल्याने अगोदरच छोटे- मोठे अपघात होत आहेत. त्यातच एअरटेल टॉवरसाठी चारी खोदण्यात आलेली आहे. त्याठिकाणी टॉवरच्या तारांची अंडरग्राउंड लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी कोणतेही सूचना फलक, डिव्हायडर व बॅरिकेटस् लावलेले नाहीत व रस्त्याच्या कडेला काम करणा-या कामगारांनादेखील सुरक्षेसाठी सेफ्टी किटदेखील दिलेले नाही. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संभाव्य अपघातांना निमंत्रण देणाºया ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.