जिल्हा परिषद सदस्य वनारसे यांच्याकडून विधवा भगिनींना अनोखी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:16+5:302021-08-23T04:17:16+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घरोघरी जाऊन सर्वेक्षण, औषध वाटप, आरोग्य तपासणी, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करण्याचे काम करणाऱ्या ...

Unique gift from Zilla Parishad member Vanarse to widowed sisters | जिल्हा परिषद सदस्य वनारसे यांच्याकडून विधवा भगिनींना अनोखी भेट

जिल्हा परिषद सदस्य वनारसे यांच्याकडून विधवा भगिनींना अनोखी भेट

Next

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घरोघरी जाऊन सर्वेक्षण, औषध वाटप, आरोग्य तपासणी, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करण्याचे काम करणाऱ्या आशा सेविका चांदोरी येथील रत्ना शिरसाठ, अनिता आंबोरे, संगीता वारघडे, मीना गडाख यांनी जिल्हाभरात आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सेवाकार्य करणाऱ्या सदस्यांना चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार (दि. २२) राख्या बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

सागर गडाख यांनीदेखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद सवई, अनिल भोर, अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ गडाख, गोकुळ टर्ले, आकाश गायखे, सुभाष फुलारे, केशव झुर्डे, अजय चारोस्कर, विलास गांगुर्डे, विलास गडाख, आशिष गायखे, पुष्कर भन्साळी, सचिन कांबळे, वैभव उफाडे आदी उपस्थित होते.

कोट...

कोरोनामुळे अनेक महिला भगिनी विधवा झाल्या आहेत. त्यात चांदोरी जिल्हा परिषद गटातील या महिलांच्या आयुष्यात एकटेपणाची भावना निर्माण झाली आहे. या भगिनींना आधार देण्याचा भाग म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्ताने या विधवा भगिनींच्या मुलांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेत एका भावाचे कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

- सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषद सदस्य

फोटो - २२ चांदोरी १

चांदोरीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा करताना आशासेविका.

२२ सिद्धार्थ वनारसे

220821\22nsk_14_22082021_13.jpg~220821\22nsk_15_22082021_13.jpg

चांदोरीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसोबत रक्षाबंधन साजरा करताना आशासेविका.~सिद्धार्थ वनारसे

Web Title: Unique gift from Zilla Parishad member Vanarse to widowed sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.