शिंगवे येथे भजन करून अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:23 PM2018-08-09T15:23:18+5:302018-08-09T15:27:39+5:30
सायखेडा: मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट बंदला गोदाकाठ भागातील सायखेडा, शिंगवे, भेंडाळी, करंजगाव, चाटोरी, सोन गाव , औरंगपूर, म्हाळसाकोरे, भुसे, मांजरगाव, चापडगाव, रामनगर या गावात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, नागरिक दिवसभर घराबाहेर पडले नसल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. सायखेडा येथे दिवसभर बंद पाळण्यात आला होता क्र ांती मोर्च्यांच्या वतीने रामविकास अधिकारी, सरपंच यांना निवेदन देण्यात आले.
सायखेडा:
मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट बंदला गोदाकाठ भागातील सायखेडा, शिंगवे, भेंडाळी, करंजगाव, चाटोरी, सोन गाव , औरंगपूर, म्हाळसाकोरे, भुसे, मांजरगाव, चापडगाव, रामनगर या गावात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, नागरिक दिवसभर घराबाहेर पडले नसल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता.
सायखेडा येथे दिवसभर बंद पाळण्यात आला होता क्र ांती मोर्च्यांच्या वतीने रामविकास अधिकारी, सरपंच यांना निवेदन देण्यात आले
शिंगवे येथे भजन
शिंगवे येथे सकल मराठा समाज्याच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिवसभर भजन म्हणत आंदोलन केले यावेळी लहानमुळे, नागरिक ,तरु ण यांनी मनोगत व्यक्त करून आपली व्यथा मांडली, भजनी आंदोलनात सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , विविध संस्थांचे पदाधिकारी सामील झाले होते. भजनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या वतीने सरकारला आवाहन करण्यात आले यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.
भेंडाळीत कडकडीत बंद
शिर्डी ,सुरत महामार्गवरील भेंडाळी येथे नागरिकांनी दिवसभर कडकडीत बंद पाळला सकाळ पासून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दिवसभर आपले कामे बंद ठेवली घराबाहेर नागरीक पडले नाही त्यामुळे दिवसभर रस्ते निर्मनुष्य दिसत होते.
म्हाळसाकोरे, करंजगाव, भुसे, चाटोरी, रामनगर , मांजरगाव, चापडगाव या गावात दिवसभर व्यापाº्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला चांगला प्रतिसाद दिला
आंदोलनाची हाक जरी मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली होती तरी गावातील सर्व जाती ,धर्माचे लोक आंदोलनातं सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते यावेळी मराठा क्र ांती मोर्चाचे जिल्हा समनव्यक धोंडीराम रायते यांनी सर्व व्यापारी, आ िणजनतेचे मराठा क्र ांती मोर्च्यांचा वतीने आभार मानले आ िण यापुढे अशीच साथ देण्याचे आवाहान केले आहे सायखेडा पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.