चांदोरी विद्यालयात ‘ग्रीन कार्ड’चा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 04:34 PM2018-10-07T16:34:21+5:302018-10-07T16:34:46+5:30
चांदोरी : जेवणात पालेभाजी म्हटली की मुले नाक मुरडतात याच पालेभाज्या मुलांनी आवडीने खाव्यात यासाठी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, चांदोरी विद्यालयातील उपशिक्षक मकरंद कापडणीस एक अनोखी कल्पना वापरु न विद्यालयात सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीन कार्ड’ उपक्र म सुरू केला आहे.
चांदोरी : जेवणात पालेभाजी म्हटली की मुले नाक मुरडतात याच पालेभाज्या मुलांनी आवडीने खाव्यात यासाठी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, चांदोरी विद्यालयातील उपशिक्षक मकरंद कापडणीस एक अनोखी कल्पना वापरु न विद्यालयात सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीन कार्ड’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्र मात ज्या विद्यार्थ्यांच्या डब्यात पालेभाजी किंवा फळभाजी असेल त्याला हे ग्रीन कार्ड दिले जाते व महिन्याच्या शेवटी ज्या विद्यार्थ्यांची ग्रान कार्डांची सरासरी जास्त असेल त्याला बक्षीस दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना पालेभाज्या तसेच फळभाज्या खाण्याची सवय लागली. यातुन विद्यार्थ्यांना विविध पालेभाज्याचे आपल्या शरीरासाठी होणारे उपयोग सांगण्यात आले. त्या संदर्भात तक्ते तयार करून सर्व वर्गात लावण्यात आले. या उपक्र मासाठी निफाड विस्तार अधिकरी विजय बागुल, प्राचार्य पी. बी. चौरे, उपप्राचार्य आर. बी. रोहमारे, पर्यवेक्षक जगताप, प्रशांत पगार, शेलार तसेच सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.