मालक-कामगारांत निर्माण झाले अनोखे नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:53 PM2020-05-23T21:53:53+5:302020-05-24T00:23:43+5:30
सातपूर (गोकुळ सोनवणे) : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यास आता दोन महिने होत असून, या काळात सर्वच कारखान्यांचे उत्पादन बंद आहेत. काही ठिकाणी कामगार कपात तर काही ठिकाणी वेतनकपात करण्यात येत आहे, अशा कालावधीत नाशिकमध्ये काही कारखान्यांत तर व्यवस्थापनाने कामगारांची काळजी घेतल्याने या संकटकाळात कामगार व्यवस्थापन यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत झाली आहे. औद्योगिक क्षेत्र म्हटले की कामगार आणि व्यवस्थापन या दोन बाजू आल्याच.

काही ठिकाणी वेतनकपात तर काही ठिकाणी कामगार कपातीच्या चर्चा आहेत. मात्र, बहुतांश कंपन्यांमध्ये सुटीच्या काळात जरी कामगारांना वेतन दिले गेले आहे. नाशिकच्या बॉश कंपनीत तर संकटकाळातदेखील कामगारांना प्रती महिना दहा हजार रुपये वेतनवाढीचा करार झाला आहे. याशिवाय अनेक कारखान्यांत मालक म्हणजेच व्यवस्थापनाने कामगारांची खूपच काळजी घेतली आहे. कारखाने बंद असले तरी कामगारांशी संपर्क साधून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करू न घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या काळात कोणालाही काही अडचण आली तर संपर्क साधण्याचे सांगितले जात आहे. एवढेच काय काही कामगारांच्या घरी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा केला जात आहे. नाशिकच्या युनायटेड हिट ट्रान्सफर प्रा. लिमी. ही कंपनीदेखील अशाच प्रकारचे काम करीत असल्याने चर्चेत आली आहे. या कंपनीने कामगारांना नियमित वेतन तर दिलेच, परंतु लॉकडाउन काळात जीवनावश्यक वस्तूंचादेखील घरपोच पुरवठा केला आहे त्यामुळे अशाप्रकारच्या संकटकाळातील आधारामुळे कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील हे नाते संकटकाळात अधिक घट्ट होताना दिसत आहे. हे नाते असेच टिकल्यास औद्योगिक क्षेत्रात कुठेही वादविवाद, संघर्ष दिसून येणार नाही.
-------------
लॉकडाउन जाहीर झाल्यापासून कारखान्याचे संचालक विवेक पाटील यांनी एचआर विभागाच्या माध्यमातून आमचे दोन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपवर आम्ही आमच्या अडचणी मांडतो. त्या अडचणी सोडविल्या जातात. दोन सहकाऱ्यांना किराणामालाची अडचण होती. त्यांना किराणा घरपोच देण्यात आला. कंपनीतर्फे १६७ कामगारांना फळे पोहोचविण्यात आले. दररोज आमचा आढावा घेतला जातो. काही कंत्राटी कामगारांना जीवनावश्यक वस्तूंसह गॅस सिलिंडरची व्यवस्था मालकांनी करून दिली आहे.
- सागर गडाख, कामगार, युनायटेड हिट ट्रान्स्फर, अंबड