सायकलिस्टची वर्दी यांना अनोखी मानवंदना

By admin | Published: July 10, 2017 12:41 AM2017-07-10T00:41:31+5:302017-07-10T00:41:53+5:30

नाशिक : सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांना सायकलिस्टने अंत्ययात्रेत सायकल चालवत अनोखी मानवंदना दिली.

Unique Sailor to Cyclist Uniforms | सायकलिस्टची वर्दी यांना अनोखी मानवंदना

सायकलिस्टची वर्दी यांना अनोखी मानवंदना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकमध्ये सायकल चळवळ रूजविणारे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांना सायकलिस्टने अंत्ययात्रेत सायकल चालवत अनोखी मानवंदना दिली. रविवारी (दि. ९) नाशिक अमरधाम येथे विर्दी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शनिवारी (दि. ८) एनआरएम राइडदरम्यान नाशिक-इगतपुरी मार्गावर जसपालसिंग विर्दी यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. रविवारी दुपारी साडेचार वाजता विर्दी यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत नाशिक सायकलिस्टच्या ४०० हून अधिक सदस्यांनी सायकल चालवत विर्दी यांच्याप्रती श्रद्धांजली अपर्ण केली. सातपूर औद्योगिक वसाहत, आयटीआय सिग्नल, सिटी सेंटर मॉल, गोविंदनगर लिंक रोड, इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरमार्गे नाशिक सायकलिस्टचा हिरवा टी शर्ट परिधान करून सायकलिस्ट सदस्यांनी काढलेल्या रॅलीचा अमरधाम येथे समारोप करण्यात आला. यावेळी सायकलिस्ट सदस्यांनी आपल्या टी शर्टवर ‘मिस यू जसपाल सर’ असे स्टिकर लावले होते. यावेळी जसपालसिंग विर्दी यांचा मुलगा हरजससिंग विर्दी आणि भाऊ गुरमितसिंग विर्दी यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलीस आयुक्तडॉ. रवींद्रकुमार सिंगल, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरिश बैजल, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, सुहास फरांदे, महेश हिरे, रतन लथ, जनक सारडा, विक्रम सारडा यांच्यासह नाशिक सायकलिस्टचे सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Unique Sailor to Cyclist Uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.