शहराजवळील पांडवलेणीवर वनस्पतीचे अनोखे विश्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:24 AM2018-07-25T00:24:48+5:302018-07-25T00:25:07+5:30
नाशिक : वार रविवार... वेळ सकाळची... भर पावसात नाशिककरांची पावले शहराजवळील पांडवलेणीकडे वळत होती... निमित्त होते नेचर क्लब आॅफ नाशिक व लायन्स क्लब आॅफ पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेचर ट्रेल’चे. पावसाळ्यामध्ये पांडवलेणीचे रूपच पालटून जाते.
या साऱ्या गोष्टी जवळून अनुभवता याव्यात या उद्देशाने या ट्रेलचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेलसाठी मुंबई येथील विख्यात वनस्पती अभ्यासक डॉ. सूचिता दत्ता उपस्थित होत्या. त्यांनी जैवविविधतेची शास्त्रीय माहिती देत त्याचा वापर कसा करायचा हेदेखील सांगितले. याप्रसंगी नीलिमा जाधव, आनंद बोरा, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रमिला पाटील, चंद्रकांत दुसाने, गीता निकम, निसार पटेल, सागर बनकर, दर्शन घुगे, नीलेश आव्हाड आदींसह निसर्गप्रेमी उपस्थित होते. फुलपाखरांच्या पाच जाती दिसल्या. पाऊस येण्याचा संकेत देणारा पंकेशियादेखील बघावयास मिळाला. शिवन, चिंच, चंदन, वाघूळफुले, चाफा आदींसह अनेक वृक्षांची माहिती यावेळी मिळाली.