जायकवाडीच्या पाण्याविरोधात सर्वपक्षांची एकजूट

By admin | Published: October 25, 2015 10:33 PM2015-10-25T22:33:48+5:302015-10-25T22:34:05+5:30

जायकवाडीच्या पाण्याविरोधात सर्वपक्षांची एकजूट

The unity of the alliance against the water of the Jayakwadi | जायकवाडीच्या पाण्याविरोधात सर्वपक्षांची एकजूट

जायकवाडीच्या पाण्याविरोधात सर्वपक्षांची एकजूट

Next

नाशिक : नाशिक व नगर जिल्ह्णातील धरण समूहातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात या दोन्ही जिल्ह्णांतील सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत़ भुजबळ फार्म येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पाण्याचा तीव्र करण्याचा निर्णय शनिवारी (दि़२४) घेण्यात आला. या लढ्याची सर्व सूत्र ही भुजबळ फार्मवरून हलविली जाणार असून, यासाठीच्या कृती समिती निमंत्रकपदी आमदार अनिल कदम यांची निवड करण्यात आली आहे़
नाशिक व नगर जिल्ह्णातील पाच धरणांतून जायकवाडी धरणात १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने दिला. जिल्ह्णात अत्यल्प धरणसाठा असून, जायकवाडीला पाणी सोडल्यास नाशिक जिल्ह्णात गंभीर स्थिती होऊ शकते. पुरेसे पाणी शिल्लक नसल्याने भविष्यात पिण्याचे पाणी व शेतीसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सध्याचा साठा हा पुढील वर्षी पाऊस होईपर्यंत वापरावा लागणार आहे. त्यामुळे इतरत्र पाणी सोडणे म्हणजे नाशिकवर अन्याय करण्यासारखेच होईल.
महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस, शिवसेना एकत्र आले आहेत, तर नगर जिल्ह्णातील काँग्रेस नेतेही एकत्र आले असून, या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी वगळता महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी जायकवाडीला पाण्याचा एक थेंबही न देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनेही गंगापूर धरणावर आंदोलन करून निर्णयास विरोध केला आहे़
माजीमंत्री मधुकर पिचड यांनी आमदार छगन भुजबळ यांची शनिवारी भेट घेऊन दोन्ही जिल्ह्णातील नेत्यांनी एकित्रत लढा देण्याबाबत चर्चा केली़ त्यास पाठिंबा दर्शवित भुजबळांनी तातडीने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून याबाबत चर्चा केली़
या गुप्त बैठकीत आंदोलन तीव्र करण्याबाबत चर्चा होऊन सोमवारी (दि.२६) पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास काय भूमिका घ्यायची याबाबत नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली़
पाणीप्रश्नाबाबत भुजबळ फार्मवर झालेल्या बैठकीत नाशिक व नगर जिल्ह्णातील सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याने आंदोलनाची धार वाढणार हे निश्चित आहे़
या बैठकीला आमदार मधुकर पिचड, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, आमदार जयवंत जाधव, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, अर्जुन टिळे, विरोधी पक्षनेता कविता कर्डक, जलसिंचनचे राजेंद्र जाधव आदि उपस्थित होते.

Web Title: The unity of the alliance against the water of the Jayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.