विरोधकांची एकी; भाजपात बेकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:46 AM2018-03-16T01:46:05+5:302018-03-16T01:46:05+5:30

नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवारीवरून सत्ताधारी भाजपात नाराजीनाट्य बघायला मिळाले तर विरोधीपक्षांनी एकत्रित येऊन भाजपाविरुद्ध शड्डू ठोकले आहे. गुरुवारी (दि.१५) स्थायी समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी सत्ताधारी भाजपात रंगलेल्या नाराजीनाट्यामुळे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Unity of Opponents; Becky BJP! | विरोधकांची एकी; भाजपात बेकी!

विरोधकांची एकी; भाजपात बेकी!

Next
ठळक मुद्देस्थायी समिती : सभापतिपदावरून सत्ताधारी पक्षात नाराजीनाट्यपहिल्यांदाच एका महिलेला स्थायी समितीच्या सभापतिपदी संधी

नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या उमेदवारीवरून सत्ताधारी भाजपात नाराजीनाट्य बघायला मिळाले तर विरोधीपक्षांनी एकत्रित येऊन भाजपाविरुद्ध शड्डू ठोकले आहे. गुरुवारी (दि.१५) स्थायी समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी सत्ताधारी भाजपात रंगलेल्या नाराजीनाट्यामुळे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महापालिका स्थायी समितीवर भाजपा-९, शिवसेना-४ आणि कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेच्या कोट्यातून प्रत्येकी एक सदस्य, असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत मुंढेपर्व अवतरल्यानंतर यंदा स्थायी समितीवर जाण्यासाठी इच्छुकांनी हात आखडता घेतला आणि सत्ताधारी भाजपाने नऊपैकी सर्वाधिक ७ महिला सदस्यांना स्थायीचे सदस्यपद बहाल केले. याशिवाय, सभागृहनेता दिनकर पाटील आणि स्थायीचे माजी सभापती उद्धव निमसे हे सभापतिपदासाठीचे प्रबळ दावेदारही स्थायीवर सदस्य म्हणून पाठविले. त्यामुळे सभापतिपदासाठी पाटील-निमसे यांच्यात चुरस निर्माण झालेली असतानाच माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांच्या पुतणी आणि माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब अहेर यांच्या कन्या हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव पुढे आले आणि नाराजी नाट्याला प्रारंभ झाला. गुरुवारी (दि.१५) सत्ताधारी भाजपातील नऊही सदस्यांना पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात बोलावून घेण्यात आले. प्रदेशाध्यक्षांकडून उमेदवारीसाठी नावाची प्रतीक्षा करण्यात आली. मात्र, हिमगौरी अहेर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजताच दिनकर पाटील, उद्धव निमसे यांचेसह भिकुबाई बागुल, मीरा हांडगे, भाग्यश्री ढोमसे यांच्यातून नाराजीचे सूर उमटायला लागले. वसंतस्मृतीवरून सर्व सदस्यांसह पक्षाचे पदाधिकारी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी येऊन धडकले. याठिकाणी शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर हिमगौर अहेर, भाग्यश्री ढोमसे आणि मीरा हांडगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या दिनकर पाटील यांनी जवळच्या नातेवाइकाचे निधन झाल्याचे निमित्त दाखवत ‘रामायण’ सोडले तर उद्धव निमसे यांनी आमदारांना खडे बोल सुनावले. तीन आमदारांच्या भांडणात कार्यकर्त्यांचा बळी जात असल्याची भावनाही यावेळी व्यक्त झाली, शिवाय अन्याय होत असेल वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडू नका, असा इशाराही दिला गेला. अर्ज दाखल करण्यासाठी अर्धा तासाचा अवधी शिल्लक असल्याने महापौरांसह भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर हे तीनही महिला इच्छुक उमेदवारांचे अर्ज सोबत घेऊन नगरसचिव विभागात आले.
यावेळी तीनही महिला उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातील, असे सांगितले जात असतानाच संभाजी मोरुस्कर यांनी केवळ हिमगौरी अहेर यांचेच अर्ज दाखल केले. त्यामुळे भाग्यश्री ढोमसे व मीरा हांडगे यांच्यात नाराजी दिसून आली. त्यापाठोपाठ भिकुबाई बागुल यांचे सुपुत्र व स्थायीचे माजी सभापती संजय बागुल यांनीही अर्ज दाखल करण्याची तयारी चालवली होती परंतु, स्वत: भिकुबाई बागुल यांनीच आपल्या पुत्राला रोखले आणि भाजपाकडून केवळ एकमेव उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला. सत्ताधारी भाजपात बेकीचे वातावरण दिसून येत असतानाच शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी यांनी एकत्रित येत सेनेच्या संगीता जाधव यांचा अर्ज दाखल करत एकीचे दर्शन घडविले आणि भाजपाविरुद्ध शंख फुंकला. आता या नाराजीनाट्याचा विरोधकांकडून कशाप्रकारे फायदा उठविला जातो, हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.निमसे-पाटील यांचा ‘ब्लाइंड गेम’स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी सभागृहनेता दिनकर पाटील यांना प्रदेश स्तरावरील नेत्याकडून शब्द मिळाला होता, असे सांगितले जाते. त्यानुसार, वर्षा भालेराव यांच्याऐवजी दिनकर पाटील यांची स्थायीच्या सदस्यपदी वर्णी लावण्यात आली होती तर उद्धव निमसे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी इच्छा व्यक्त केली नसतानाही स्थायीचे सदस्यपद बहाल करण्यात आले. पाटील-निमसे यांना एकाच आखाड्यात उतरवून झुंज लावण्याचा प्रयत्न झाला. परंतु, पाटील व निमसे यांच्याऐवजी हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव पुढे आणले गेले आणि पाटील-निमसे यांचा ब्लाइंड गेम करण्यात आल्याची भावना पक्षात पसरली. महिलेला संधी देण्यासाठी हिमगौरी अहेर यांचे नाव अंतिम केल्याचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगताच पाटील-निमसे यांनी ‘महिलाराजच आणायचे ठरले होते तर आम्हाला स्थायीवर कशासाठी पाठविले’असा सवाल उपस्थित केला. त्यातून आमदार व पाटील-निमसे यांच्यात शाब्दिक चकमकीही झडल्याचे समजते. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. आमदार बाळासाहेब सानप यांच्याच आदेशानुसार पक्ष चालतो. ते सांगतील तसेच आम्ही ऐकतो. आता स्थायी समितीच्या सदस्यपदीही ठेवायचे की नाही, हे बाळासाहेब सानप हेच ठरवतील. - दिनकर पाटील, सभागृहनेतापक्षाने पहिल्यांदाच एका महिलेला स्थायी समितीच्या सभापतिपदी संधी दिलेली आहे. पक्षाचा निर्णय मान्य आहे. माझी कोणतीही नाराजी नाही. पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार वाटचाल करू.
- उद्धव निमसे, सदस्य, स्थायी समिती

 

Web Title: Unity of Opponents; Becky BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.