आदिवासी सदस्यांची विशेष सभेसाठी एकजूट स्वाक्षरी मोहीम, अध्यक्षांना पत्र
By admin | Published: January 20, 2015 01:10 AM2015-01-20T01:10:57+5:302015-01-20T01:13:51+5:30
आदिवासी सदस्यांची विशेष सभेसाठी एकजूट स्वाक्षरी मोहीम, अध्यक्षांना पत्र
नाशिक : आदिवासी उपयोजनेअंतर्गत विविध योजनांची जिल्हा परिषद सदस्यांना माहिती होण्यासाठी जिल्हा परिषदेची तत्काळ एक विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या आदिवासी संवर्गातील सदस्यांनी केली असून, त्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात सुरुवात केली आहे. विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांची आवश्यकता असते. जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची संख्या ७३ असून, त्यात आदिवासी संवर्गातील सदस्यसंख्या जवळपास ४०च्या घरात आहे. प्रा. प्रवीण गायकवाड व बंडू गांगुर्डे यांच्यासह सुभाष गागुंर्डे, सीमा बस्ते, शीतल कडाळे, ज्योती माळी आदिंसह डझनभर सदस्यांनी आदिवासी उपयोजनांची आदिवासी सदस्यांना माहिती होण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात यावी. ५० टक्के आदिवासी क्षेत्र व ५० टक्के बिगर आदिवासी क्षेत्र याप्रमाणे जिल्'ाची भौगोलिक स्थिती असून, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण, शंभर टक्के आदिवासी, तर दिंडोरी, इगतपुरी, देवळा, बागलाण हे अंशत: आदिवासी तालुके आहेत. जिल्'ातील आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच आदिवासी भागातील अडी-अडचणी चर्चा करून सोडविण्यासाठी व जनतेची कामे सुलभतेने मार्गी लागावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यांची बैठकीचे आयोजन होऊन चर्चा होणे आवश्यक आहे. आदिवासी उपयोजनेत काम करणाऱ्या जिल्हास्तरीय विविध अधिकारी यांच्या मार्गदर्शन होण्यासाठी जिल्'ातील आदिवासी विकास विभागांंचे अधिकारी यांना या सभेस विशेष निमंत्रित म्हणून निमंत्रित करण्यात यावे व तत्काळ सभेचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी या आदिवासी सदस्यांनी अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)