मोरे महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:55 AM2018-02-11T00:55:07+5:302018-02-11T00:55:07+5:30
निफाड : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक विस्ताराबरोबर प्रबोधनात्मक उपक्र म राबविणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दर्जा उच्च आहे.
निफाड : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक विस्ताराबरोबर प्रबोधनात्मक उपक्र म राबविणाºया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दर्जा उच्च आहे. पुणे विद्यापीठातून शिक्षण घेणारे विद्यार्थी जगाच्या कानाकोपºयात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांनी केले. निफाड येथील मविप्रचे कर्मवीर गणपत दादा मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.व्ही. रसाळ होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. दिनेश पाटील यांची सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ पुणे, अधिसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. गांधी रिसर्च फाउण्डेशन जळगाव यांच्या वतीने आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी गायत्री दशरथ सोपे हिचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. एस. गायकवाड यांनी केले.