आरोग्य विद्यापीठ बृहत आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 01:26 AM2021-05-26T01:26:05+5:302021-05-26T01:26:43+5:30

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने दर पाच वर्षांनी यथार्थदर्शी योजनांचा बृहत आराखडा तयार केला जातो. सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी बृहत आराखडा तयार करण्याचे कामकाज सुरू झाले असून यासाठी आरोग्य शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, नागरिकांकडून अभिप्राय किंवा सूचना मागविण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

The University of Health is in the process of preparing a comprehensive plan | आरोग्य विद्यापीठ बृहत आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू

आरोग्य विद्यापीठ बृहत आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देअभिप्राय मागविले : पुढील पाच वर्षाचा आराखडा हेाणार तयार

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने दर पाच वर्षांनी यथार्थदर्शी योजनांचा बृहत आराखडा तयार केला जातो. सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी बृहत आराखडा तयार करण्याचे कामकाज सुरू झाले असून यासाठी आरोग्यशिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, नागरिकांकडून अभिप्राय किंवा सूचना मागविण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेपासून आतापर्यंत पाच बृहत आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने आता सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी सहावा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी दिली. विद्यापीठाचा बृहत आराखडा सर्वसमावेशक असावा याकरीता विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाचे विविध प्राधिकरणाचे सदस्य प्रयत्नशील असून त्यासाठी विद्यापीठाची सहावी यथार्थदर्शी योजना (परस्पेटिव्ह प्लॅन) अद्ययावत करण्यासाठी आरोग्य शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, नागरिकांकडून अभिप्राय किंवा सूचना मागविण्यात आल्या आहेत.

राज्यात आरोग्य विज्ञान शिक्षण सुविधांचे समन्यायी वाटप व्हावे या दृष्टिकोनातून उच्चतर शिक्षणाच्या संस्थांची स्थाने निश्चित करण्यासाठी शैक्षणिक विकासाची यथार्थदर्शी विद्यापीठ योजना तयार करण्यात येतो. शासनाने निर्देशित केल्यानुसार राज्यातील दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा मिळण्यासाठी महाविद्यालय सुरु करण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येते. त्याचा अंतर्भाव आराखड्यात केला जातो. या संदर्भात आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी विद्यापीठास सूचना, मार्गदर्शन करावे. सदर मार्गदर्शन, सूचना विद्यापीठास टपाल किंवा ई-मेल व्दारा विद्यापीठाकडे सादर पाठविण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

विद्यापीठ अधिनियमानुसार पाच वर्षांकरिता अद्ययावत बृहत आराखडा तयार करण्यात येतो. यामध्ये राज्यातील विविध विद्याशाखांचे महाविद्यालये, स्थानिक

लोकसंख्या, जिल्हा किंवा तालुक्यातील महाविद्यालयांची संख्या, महाविद्यालयातील अंतर, महापालिकेस संलग्नित महाविद्यालय आदी बाबी महत्त्वपूर्ण असतात. याकरीता विद्यमान सन्माननीय मा. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य, विविध संस्थांचे संस्थाचालक, विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, समाजसेवक, जिल्हा शल्यचिकित्सक यांची मते विचारात घेतली जातात. विद्यापीठाची स्थापना ३ जून १९९८ मध्ये झाली. आजपावेतो पाचवेळा बृहत आराखडा तयार करण्यात आला होता.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या संदर्भात माहिती प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाच्या नियोजन विभागाचे प्र. संचालक डॉ. राजीव आहेर यांनी सांगितले. विद्यापीठाची सहावी यथार्थदर्शी योजना दर्जेदार व्हावी याकरिता नागरिकांनी व संबंधितांनी आपले अभिप्राय किंवा सूचना

असल्यास अधिकृत ई-मेलवरून विद्यापीठास planning@muhs.ac.in या ईमेलवर

किंवा टपालाव्दारे दि. १० जूनपर्यंत पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The University of Health is in the process of preparing a comprehensive plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.