आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘कोविड सुरक्षाकवच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:28 PM2020-07-13T17:28:58+5:302020-07-13T17:31:16+5:30

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्रातील २०२० परीक्षेकरिता वास्तव्याच्या ठिकाणापासून जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच कोविड - १९च्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना ’कोविड सुरक्षाकवच योजना लागू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाने कोविड सुरक्षाकवच योजनेस मंजुरी दिल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली. 

University of Health Sciences students | आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘कोविड सुरक्षाकवच’

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘कोविड सुरक्षाकवच’

Next
ठळक मुद्देउपचारासाठी एक लाख रुपये परीक्षेकरिता जवळचे परीक्षाकेंद्र निवडण्याचा पर्याय

नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्रातील २०२० परीक्षेकरिता वास्तव्याच्या ठिकाणापासून जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच कोविड - १९च्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना ’कोविड सुरक्षाकवच योजना लागू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाने कोविड सुरक्षाकवच योजनेस मंजुरी दिल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली. 
   कोविड-१९च्या आपत्कालीन परिस्थितीत विशेष बाब म्हणून विद्यार्थी त्यांच्या वास्तव्याच्या जवळचे, त्यांच्या अभ्यासक्र माचे महाविद्यालय हे परीक्षा केंद्र म्हणून निवडू शकणार आहेत. तसेच सद्यस्थितीत ते ज्या महाविद्यालयात प्रवेशित आहेत ते महाविद्यालयदेखील ते परीक्षा केंद्र म्हणून निवडू शकतात. ज्या परीक्षा केंद्राची ते निवड करतील तेथूनच त्यांना लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी हजर राहावे लागणार आहे. पदवीपूर्व सर्व अभ्यासक्र मांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना  कोविड-१९मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास करू नये या उद्देशाने त्यांनी त्यांच्या घराजवळच्या त्यांच्या विद्याशाखेच्या महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्र म द्यावा, असे विद्यापीठातर्फे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत विद्यापीठास मंगळवार (दि.१४) पर्यंत निवडलेल्या पसंतीक्र म पाठवावा. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाकडून कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना’ कोविड सुरक्षाकवच’ योजनेअंतर्गत, विद्यार्थी आजारी झाल्यास उपचारासाठी रु पये एक लाख व दुर्दैवी मृत्यू झाल्यास रु पये तीन लाख इतकी रक्कम प्रदान करण्यात येणार असल्याचेही डॉ. अजित पाठक सांगितले. दरम्यान, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कोविड-१९ करिता शासनाने निर्देशित केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. 

 

Web Title: University of Health Sciences students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.