हिरावाडीत अज्ञाताने पेटविली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:12 AM2019-07-23T01:12:31+5:302019-07-23T01:12:46+5:30

हिरावाडी परिसरात असलेल्या भगवतीनगर येथे सोमवारी (दि.२२) पहाटे दीड वाजेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी बंगल्याबाहेर उभी केलेली भाजीपाला व्यापाऱ्याची चारचाकी टाटा हेक्सा गाडी पेट्रोल ओतून जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे.

Unknown car burnt in Hirawadi | हिरावाडीत अज्ञाताने पेटविली कार

हिरावाडीत अज्ञाताने पेटविली कार

Next

पंचवटी : हिरावाडी परिसरात असलेल्या भगवतीनगर येथे सोमवारी (दि.२२) पहाटे दीड वाजेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी बंगल्याबाहेर उभी केलेली भाजीपाला व्यापाऱ्याची चारचाकी टाटा हेक्सा गाडी पेट्रोल ओतून जाळून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यवसाय करणारे दिलीप अंबरपुरे हिरावाडीत भगवतीनगरला राहात असून, रविवारी (दि.२१) रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे टाटा हेक्सा क्र मांक (एमएच १५, जीएफ ८०८९) गुरु कृपा बंगल्याबाहेर उभी केली होती. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असताना काही समाजकंटकांनी टाटा हेक्सा कारवर पेट्रोल ओतून पेटवून दिली.
काही वेळाने गाडीच्या काचा फुटल्याने जोराचा आवाज झाला व आजूबाजूला राहणारे नागरिक जागे झाले. गाडी जळाल्याचे समजतात अंबरपुरे यांनी बंगल्याबाहेर धाव  घेतली असता चारचाकी जळताना दिसली. त्यांनी सदर माहिती पोलिसांना कळविली व काही वेळाने घटनास्थळी पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पेटलेली टाटा हेक्सा चारचाकी विझविली. भरवस्तीत घडलेल्या चारचाकी जाळपोळीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हसरूळ परिसरातील बोरगड येथील वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती. तर यापूर्वीदेखील पंचवटीत गाड्या जाळणे, चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. हिरावाडीत जाळलेल्या चारचाकी घटनेत परिसरात राहणाºया गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयितांचा हात असल्याची चर्चा सुरू असून, त्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Unknown car burnt in Hirawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.