अज्ञात रोगाने पाच जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:17 AM2019-04-04T00:17:45+5:302019-04-04T00:18:15+5:30
कंधाणे : येथे बऱ्याच शेतोपयोगी पाळीव जनावरांना फऱ्यासदृश आजाराची लागण झाली असून, आतापर्यंत परिसरात या रोगाची लागण झालेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे. या भागात जनावरांना लसीकरण चालू असून, बºयाच जनावरांना लसीकरण झाल्यावरही जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कंधाणे : येथे बऱ्याच शेतोपयोगी पाळीव जनावरांना फऱ्यासदृश आजाराची लागण झाली असून, आतापर्यंत परिसरात या रोगाची लागण झालेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे. या भागात जनावरांना लसीकरण चालू असून, बºयाच जनावरांना लसीकरण झाल्यावरही जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
या आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. आधीच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकºयांसमोर हे नवीन संकट उभे राहिल्याने बळीराजा पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या भागातील शेतकरी वर्गाचा शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हे प्रमुख कमाईचे साधन असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दुधाळ जनावरे पाळली जात आहेत. बºयाच शेतकरीवर्गाचे सध्या दुष्काळात दुग्ध व्यवसाय अर्थार्जनाचे साधन बनले आहे.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या भागातील पाळीव जनावरांना सध्या ताप येऊन पायाच्या सांध्यातील (फºया) भाग खुजून लागण झालेले जनावर चारा, पाणी पिणे, चारा खाणे बंद करते व लगेच त्याचा मृत्यू होत असल्याची माहिती नुकसानग्रस्त बळीराजांकडून मिळत आहे. लागण झालेल्या काही जनावरांना लसीकरणसुद्धा केले, तरीही जनावरांचा मृत्यू झाला आहे तर काही शेतकºयांनी औषधोपचारास विलंब होत असल्याने जनावरांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. मृत्यू पावलेल्या जनावरांमध्ये काही दुधाळ जनावरे व बैलांचा समावेश असून, या रोगामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना लाखों रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
दुष्काळात या आजारामुळे जिवापाड जपलेल्या जनावरांचा डोळ्यासमोर मृत्यू पाहण्याचा दुर्दैवी योग शेतकºयावर आला आहे. शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव यात दुष्काळाच्या झळा यामुळे आधीच बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. पुढील काही महिन्यांत येऊन ठेपलेल्या पेरणीच्या हंगामाआधी बैलांचा मृत्यू झाल्याने पेरणी हंगाम करावयाचा कसा? या विवंचनेत नुकसानग्रस्त बळीराजा सापडला आहे. कंधाणेत फºयासदृश आजाराने पाच जनावरे दगावली असताना तालुक्यातील जबाबदार अधिकाºयांकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. या भागात जनावरे दगावत असताना स्थानिक एक कर्मचारी लसीकरणाची जवाबदारी पार पाडत आहे. येथे तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी संख्या वाढून लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे असताना त्याकडे काणाडोळा केला जात असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे. संबंधित विभागाने राहिलेल्या भागात त्वरित लसीकरण पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून फºयासदृश आजाराची लक्षणे बैलाला जाणवत होती. याबाबत संबंधित विभागातील पशुवैद्यकीय अधिकाºयांना कळविले होते. त्यानंतर आजारी बैलाला लसीकरण केले गेले; पण लसीकरणास विलंब झाल्यामुळे हजारो रुपये किमतीचा बैल डोळ्यादेखत दगावला. वेळीच लसीकरण झाले असते तर आज दुष्काळात जिवापाड जपलेला बैल जिवंत राहिला असता.
- सागर बिरारी, शेतकरी कंधाणेअति उष्माघाताने जनावरांचा मृत्यू संभवू शकतो. तालुक्यात सध्या फºया रोगाचे लसीकरण चालू आहे. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे काही भागात लसीकरणास विलंब होत आहे.
- डॉ. चंदनप्रकाश रूद्रवंशी, प्रभारी सहायक आयुक्त, सटाणा कंधाणे परिसरात लसीकरण चालू असून, पशुपालकांनी सकाळी लवकर लसीकरण करून घ्यावे, शक्यतो दुपारच्या आधी लसीकरणासाठी आलेल्या पशुवैद्यकीय अधिकाºयांकडून जनावरांना लसीकरण करून घ्यावे. उन्हापासून जनावरांचे संरक्षण करावे.
- डॉ. जी.टी. बोरोले,
पशुवैद्यकीय अधिकारी, कंधाणे