क्लासेसचालक संघटनेची निवडणूक बिनविरोध

By Admin | Published: January 31, 2016 11:24 PM2016-01-31T23:24:57+5:302016-01-31T23:27:11+5:30

क्लासेसचालक संघटनेची निवडणूक बिनविरोध

Unlawful election of the Classes Organization Association | क्लासेसचालक संघटनेची निवडणूक बिनविरोध

क्लासेसचालक संघटनेची निवडणूक बिनविरोध

googlenewsNext

नाशिक : कोचिंग क्लासेस- चालकांची संघटना प्रोफेशनल टीचर असोसिएशन या संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. संघटनेच्या अध्यक्षपदी जयंत मुळे, तर सरचिटणीसपदी कैलास देसले यांची एकमताने विनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी मुकुंद रनाळकर, ज्ञानेश्वर म्हस्के, खजिनदारपदी लोकेश पारख, कार्याध्यक्ष वाल्मीक सानप, संजय अभंग, महिला प्रतिनिधी म्हणून ज्योती हिरे, प्रतिभा मराठे, रोहिणी भामरे यांची निवड करण्यात आली. तसेच संघटनेच्या प्रवक्तेपदी अशोक देशपांडे, सहकार्याध्यक्ष शांताराम तांबे, शशिकांत तिडके, कार्यवाह फैजल पटेल, सहकार्यवाहपदी विजय जाधव, सुभाष जाधव, संघटकपदी डोंगरसिंग राजपूत, सहसंघटक प्रकाश घरटे, के. एन. सपकाळे, राज्यप्रतिनिधी विलास सानप, कैलास खताळे, यशंवत बोरसे यांची निवड करण्यात आली. तसेच विभागप्रमुख गोरक्ष इंगळे (सिन्नर), अनिल दवणे (दिंडोरी), माणिक शिंदे (चांदवड), पवन जोशी, अमर भिडे (पंचवटी), महेंद्र कोरडे (नाशिकरोड), ज्ञानेश्वर मोजाड (दे. कॅम्प), प्रशांत हासे, अतुल आचाळे (मध्य नाशिक), चंद्रशेखर गाडे, रमेश शिर्रोजकर (इंदिरानगर), विक्रम राजे (पाथर्डी), बी. एल. मेंढीकर (द्वारका), अमित सोनवणे (सिडको) आदिंची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Unlawful election of the Classes Organization Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.