बेकायदेशीररीत्या वृक्षाच्या फांद्या तोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:34 AM2019-06-08T00:34:44+5:302019-06-08T00:35:01+5:30
दिंडोरीरोडवरील मेरी पाटबंधारे विभागात असलेल्या मोकळ्या जागेतील तीन वृक्षांच्या फांद्या विनापरवाना तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वृक्षाच्या फांद्या छाटण्यापूर्वी महापालिका प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असताना संबंधितांनी कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना वृक्षाच्या फांद्या तोडल्याप्रकरणी पंचवटी मनपा उद्यान विभागामार्फत पंचनामा करण्यात आला असून, संबंधितांना लेखी नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी पाटबंधारे विभागात असलेल्या मोकळ्या जागेतील तीन वृक्षांच्या फांद्या विनापरवाना तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वृक्षाच्या फांद्या छाटण्यापूर्वी महापालिका प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असताना संबंधितांनी कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना वृक्षाच्या फांद्या तोडल्याप्रकरणी पंचवटी मनपा उद्यान विभागामार्फत पंचनामा करण्यात आला असून, संबंधितांना लेखी नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नर भिंतीलगत पाटबंधारे विभागाच्या जागेत चंदनाचे, बोरीचे व विलायती चिंचेचे झाड असून, दोन दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागातील काही संबंधित अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून या वृक्षांच्या फांद्या बेकायदेशीरपणे छाटण्यात आल्या आहे. सदर ठिकाणी उद्यान बनविण्याचे काम सुरू असून, उद्यान बनविण्यासाठी वृक्ष फांद्या छाटून घेर कमी करण्यात आला आहे.
सदर वृक्षांच्या फांद्या बेकायदेशीरपणे छाटल्याबाबत सोशल मीडियावर संदेश व्हायरल झाल्याने तसेच मनपा उद्यान विभागाकडे फोनवर तक्रार आल्याने तत्काळ दखल घेऊन उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून विनापरवाना वृक्ष फांद्या छाटल्या प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावण्याचे काम करत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
मेरी पाटबंधारेच्या जागेत असलेले चंदन बोर व विलायती चिंचेच्या झाडाच्या फांद्या बेकायदेशीरपणे जोडल्या आहेत. मनपाची परवानगी न घेता वृक्षतोड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. महापालिका प्रशासनाने विनापरवाना वृक्ष फांद्या छाटणाºया संबंधित विभागाच्या अधिकाºयांना नोटिसा देऊन गुन्हा दाखल करावा अन्यथा वृक्षप्रेमी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
- किरण काकड, वृक्षप्रेमी