आगोदर विनामास्क फोटो; नंतर दंड वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 08:49 PM2021-02-24T20:49:11+5:302021-02-25T01:31:00+5:30

नाशिक: कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. विनामास्क आढळणाऱ्यांवर हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत. विशेष म्हणजे, संबंधितांचा अगोदर फोटो काढून नंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Unmasked photo before; The fine was later recovered | आगोदर विनामास्क फोटो; नंतर दंड वसुली

आगोदर विनामास्क फोटो; नंतर दंड वसुली

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : जिल्हाधिकारी कार्यालयात मास्क सक्तीचा

नाशिक: कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. विनामास्क आढळणाऱ्यांवर हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत. विशेष म्हणजे, संबंधितांचा अगोदर फोटो काढून नंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी शासकीय कार्यालयांत मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच कार्यालय आवारात मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींकडून हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. केवळ मास्क जवळ आहे. परंतु, त्याचा वापर केला जात नसेल म्हणजेच मास्क तोंडाला लावलेला नसेल तरीही विनामास्क समजूनच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

कारवाईसाठी नियुक्त केलेले कर्मचारी विनामास्क असलेल्यांचा अगोदर मोबाईलमध्ये फोटो काढून नंतर दंडात्मक कारवाई करणार आहेत. दंडाची पावतीदेखील संबंधितांना दिली जाणार आहे. वसूल झालेली रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे. या सर्व परिस्थितीवर निवासी उपजिल्हाधिकारी हे लक्ष ठेवणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय आवारात विनामास्क विरूद्धची मोहीम राबविली जाणार आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता वेळीच पायबंद घालण्याच्या दृष्टीने शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात विनामास्क असणाऱ्यांना हजार रुपये दंड आकारला जात आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विनामास्कविरूद्धची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शासकीय कार्यालय आवारात संबंधित विभागप्रमुखांकडूनही दक्षता घेतली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच सर्व आस्थापना,सार्वजनिक ठिकाणे,सर्व समारंभ, कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित नागरिक यांना मास्क सक्तीचा करण्यात आल्याचे स्वतंत्र आदेशदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती, संस्था आणि संघटना यांच्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन साथरोग कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Unmasked photo before; The fine was later recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.