पंचाळेच्या उपसरपंचपदी छाया आसळकर बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:13 AM2018-03-28T00:13:59+5:302018-03-28T00:13:59+5:30
सिन्नर : तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया शिवाजी आसळकर यांची बिनविरोध निवड झाली. सुमन जगन्नाथ थोरात यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सदर पद रिक्त होते. सरपंच भोमनाथ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती. उपसरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत छाया आसळक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून सुमन मधुकर थोरात यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत आसळक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यातआली.विशेष बैठकीस ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब थोरात, शरद गव्हाणे, नवनाथ सैंद्रे, चहाबाई मोरे, रेखा जगताप, संदीप थोरात, ग्रामसेवक पी. आर. शिरोळे उपस्थित होते. आसळक यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष छबू थोरात यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच आसळक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अरुण थोरात, लक्ष्मण थोरात, रामनाथ थोरात, कैलास थोरात, गोरक्षनाथ आसळक, शिवाजी आसळक, सर्जेराव आसळक, चांगदेव आसळक, कैलास तुपसुंदर, बाळासाहेब थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.