मनपात तीन विषय समित्यांचे सभापती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:11 AM2020-12-09T04:11:38+5:302020-12-09T04:11:38+5:30
महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुका लांबल्या होत्या. मात्र, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी १० डिसेंबर रोजी ...
महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुका लांबल्या होत्या. मात्र, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी १० डिसेंबर रोजी निवडणुका घेण्याचे घोषित करून त्यासाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना प्राधीकृत केले आहे. मंगळवारी (दि.८) या समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपच्या स्वाती भामरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर याच समितीसाठी भाजपच्या मीरा हांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. अशाप्रकारे विधी समितीच्या सभापतीसाठी भाजपच्या कोमल प्रताप मेहरोलिया, तर उपसभापतिपदी भाजपच्याच भाग्यश्री ढाेमसे तसेच वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापतिपदासाठी पुष्पा साहेबराव आव्हाड, तर उपसभापतिपदासाठी नीलेश ठाकरे यांचेही एकेक अर्ज आल्याने त्यांच्या निवडीची औपचारिकताच शिल्लक आहे.
शहर सुधार समिती सभापतिपदासाठी भाजपच्या छाया देवांग आणि शिवसेनेचे सुदाम डेमसे यांनी अर्ज दाखल केले असून, उपसभापतिपदासाठी भाजपच्या अलका आहिरे यांनाही डेमसे यांनीच आव्हान दिले आहे. महापालिकेच्या प्रत्येक समितीत एकूण नऊ पैकी पाच सदस्य भाजपचे असून, त्यामुळेच ही समितीदेखील भाजप सहज मिळविणे शक्य आहे.
...इन्फो..
भामरे यांची लॉटरी
महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यपदाचा हिमगौरी आडके यांनी राजीनामा दिल्याने सोमवारी (दि.७) महासभेत स्वाती भामरे यांची नियुक्ती महापौरांनी केली हाेती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची या समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली.