डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अंकुश माळी यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 08:54 PM2020-10-22T20:54:20+5:302020-10-23T00:08:46+5:30
मेशी- देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामपंचायती च्या उपसरपंचपदी अंकुश विष्णू माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तनानुसार उपसरपंच सत्यभामा सावंत यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच दयाराम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी विशेष बैठक घेण्यात आली.
मेशी- देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामपंचायती च्या उपसरपंचपदी अंकुश विष्णू माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तनानुसार उपसरपंच सत्यभामा सावंत यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच दयाराम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी विशेष बैठक घेण्यात आली. निर्धारित वेळेत माळी यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसेवक सतीश मोरे यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. बैठकीस ग्रामपंचायत सदस्य लालजी सावंत,विनोद सावंत, बापू केदारे,मंजुळाबाई पानसरे,रेशमाबाई सावंत, मिराबाई सावंत,आशा सावंत आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच अंकुश माळी यांचा सरपंच दयाराम सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गावातील शेतकरी एकनाथ पानसरे यांची कन्या तथा कृष्णाजी माऊली विद्यालयाची माजी विद्यार्थीनी ज्योत्सना पानसरे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले त्यामुळे तीचाही सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. ग्रामीण भागातील आणि सर्व सामान्य कुटूंबातील मुलीचा इतरांना आदर्श इतरांनी घ्यावा असे सरपंच दयाराम सावंत यांनी सांगितले. .सरपंच दयाराम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून काम करणार असल्याचे माळी यांनी सांगितले.