पाथरे बुद्रूक ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 09:47 PM2020-12-30T21:47:11+5:302020-12-31T00:17:00+5:30

पाथरे : पर्यावरणपूरक विकासरत्न तसेच महात्मा गांधी तंटामुक्त विजेता गाव पुरस्कार प्राप्त पाथरे बुद्रूक ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध करण्यात आली.

Unopposed election of Pathre Budruk Gram Panchayat members | पाथरे बुद्रूक ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड

पाथरे बुद्रूकच्या ग्रामपंचायतीचे बिनविरोध निवड झालेले सदस्य , कार्यकर्ते आणि ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्देनऊ जागांसाठी ९ अर्ज दाखल

पाथरे : पर्यावरणपूरक विकासरत्न तसेच महात्मा गांधी तंटामुक्त विजेता गाव पुरस्कार प्राप्त पाथरे बुद्रूक ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रणधुमाळी सुरू असून निवडणुकीत रंगत वाढत आहे. दरम्यान पाथरे बुद्रूक ग्रामपंचायतीची निवडणूक नऊ जागांसाठी बिनविरोध करण्यात आली. नऊ जागांसाठी बुधवारी ( दि. ३० ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नऊ जागांसाठी ९ अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले. संपूर्ण पाथरे बुद्रूक गावाने संघटित होऊन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक काळात त्यात मतभेद, वाद विवाद, सूडाची भावना, पैसा खर्च होणे आदी प्रकार होत असत. परंतु ग्रामस्थांनी वेळीच एकत्र येत बिनविरोधचा निर्णय घेतला.

कोकाटे पॅनल आणि वाजे पॅनलच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आदर्श निर्माण करण्याचा हा निर्णय घेतला. यासाठी सर्व पाथरे बुद्रूक ग्रामस्थांनीही प्रयत्न केला.

बिनविरोध निवड झालेले सदस्य -
पाथरे बुद्रूक वार्ड क्रमांक एक मधील बिनविरोध उमेदवार - गणेश रंगनाथ चिने, वाल्मिक दगडू माळी, मनीषा योगेश बिडवे.

वार्ड क्रमांक दोन मधील उमेदवार - सुजाता भाऊसाहेब नरोडे, कुसुम राजेंद्र राहटळ, प्रतिभा चंद्रकांत चिने.
वार्ड क्रमांक तीन मधील सदस्य - निकिता संजय थोरात, स्वाती सचिन नरोडे, भारती मच्छिंद्र गीते.

 

Web Title: Unopposed election of Pathre Budruk Gram Panchayat members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.