निऱ्हाळे ग्रामपंचायत निवडणूकीत दोन महिला उमेदवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 05:01 PM2021-01-01T17:01:57+5:302021-01-01T17:03:40+5:30
निऱ्हाळे : येथील ग्रुप ग्रामपंचायतीची नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी २४ अर्ज दाखल झाले होते. त्यात वार्ड क्र.तीनमध्ये दोन महिलांची बिनविरोध निवड झाली असून, दि. ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या माघारीच्या वेळी खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
निऱ्हाळे फत्तेपुर ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक दरवेळी चर्चेचा विषय असल्याने तालुकावासीयांच्या नजरा याकडे लागल्या आहेत. यावेळी मागील सरपंच अण्णा काकड यांनी दुसऱ्यांदा अर्ज दाखल केला असून, उर्वरित उमेदवारांमध्ये काही नवोदित तर काही युवकांचा समावेश आहे. त्यात वार्ड क्र.एकमध्ये रमेश काकड, छबू सांगळे, कांताबाई वाघ, अनिता वाघ, बाबासाहेब कांदळकर, गणेश कांदळकर, सदाशिव सांगळे, विक्रम सांगळे, वंदना सांगळे, पुष्पा सांगळे, विष्णू सांगळे, गणेश सांगळे तर वार्ड क्र. दोनमध्ये ज्योती कळसकर, कांताबाई शिंदे, किरण थोरात, रोहिणी शिंदे, शोभा देशमुख, सरला देशमुख, सोपान काकड व वार्ड क्र. तीनमध्ये माजी सरपंच अण्णा काकड, रावसाहेब काकड, एकनाथ केकाणे यांनी अर्ज दाखल केले आहेत. वार्ड क्र. तीनमध्ये मनिषा यादव व योगिता जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी नवीन वार्ड रचना झाल्यामुळे अनेक मतदारांचे वार्ड बदलले आहेत. गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पुढच्या चार दिवसांत काय होते, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.