असंघटित कामगार विकासाच्या प्रवाहापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:15 AM2019-05-23T00:15:29+5:302019-05-23T00:15:46+5:30
असंघटित कामगार दिवसाला १० ते १४ तास काम करतात. कोणत्याही सोयी-सुविधा आणि सवलती नाहीत. नोकरीची हमी किंवा कसलीही सुरक्षितता नाही, नियमितपणे काम असे ठरलेले नाही, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसानभरपाई नाही, भविष्य निर्वाह निधी आणि विमा पॉलिसीचा प्रश्न येतच नाही, त्याचप्रमाणे काही आजार झाल्यास मालकवर्गाकडून नुकसानभरपाई दिली जात नाही.
नाशिक : असंघटित कामगार दिवसाला १० ते १४ तास काम करतात. कोणत्याही सोयी-सुविधा आणि सवलती नाहीत. नोकरीची हमी किंवा कसलीही सुरक्षितता नाही, नियमितपणे काम असे ठरलेले नाही, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसानभरपाई नाही, भविष्य निर्वाह निधी आणि विमा पॉलिसीचा प्रश्न येतच नाही, त्याचप्रमाणे काही आजार झाल्यास मालकवर्गाकडून नुकसानभरपाई दिली जात नाही.
असंघटित कामगार विकासाच्या प्रवाहापासून दूर जात असून, शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे बालमजुरीत मात्र वाढ होत आहे. नाशिक शहरासह राज्यातील अनेक भागांत हेच चित्र दिसून येते.
असंघटित आशा कामगारांना डावलून तो फक्त कार्यालयामध्ये बसणाऱ्या कामगारांसाठी थोड्याशा सुविधा मिळतात. मात्र मोल मजुरी करणाºया कामगारांकडे शासनाचे लक्ष जात नाही तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे याकडे त्यामुळे हे असंघटित कामगार मोलमजुरी करत आपल्या लहान बालकांसह दारिद्र्र्य सहन करत असतात व बालमजुरीला येथूनच सुरुवात होत असते.
आज २१व्या शतकात सुद्धा मालकवर्गाकडून, भांडवलदारांकडून असंघटित मोलमजुरी करणाºया कामगारांचे फार भयानकरीत्या शोषण होत आहे आणि त्यामुळे शोषित कामगार शोषितच राहिला आणि अस्तित्वात असलेल्या अनेक चांगल्या कामगार कायद्यांचा लाभ या कामगारांना मिळू शकला नाही. किमान वेतन कायदा असूनही या कामगारांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही. औद्योगिकदृष्ट्य अत्यंत सुधारलेल्या शहरात सुद्धा मालकवर्ग, भांडवलदार अजूनही या कामगारांचे शोषण करून एकाचे अनेक उद्योग उभे करून धनदांडगे, धनसंपन्न झालेले ठेकेदार व भांडवलदार आहे, पण त्यांची नजर या सामान्य कामगारांकडे गेलीच नाही.
या असंघटित कामगारांसाठी सरकारने किती कायदे बनवले तरी सरकार त्यांच्या अंमलबजावणीकडे काटेकोरपणे लक्ष देत नाही. त्यामुळे असंघटित कामगारांमध्ये प्रचंड बालमजुरीला खतपाणी घातले गेले आहे. त्यामुळे शासनाने या असंघटित कामगारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे जेणे करून बालमजुरीकडे वळालेल्या बालकांना शिक्षणाच्या व विकासाच्या प्रवाहात आणण्यास मदत होईल.
सरकारी कामगारांना पगारी सुट्टी शिवाय वेतन भत्ता व बोनसदेखील मिळते व आमच्यासारख्या मोलमजुरी करणाºया कामगारांकडे ना ठेकेदाराचे लक्ष ना शासनाचे शिवाय आमच्या मुलांच्या शिक्षणाकडे देखील लक्ष नाही त्यामुळे आम्हाला त्यांना आमच्यासोबत कामावर घेऊन यावे लागते. पगारात वाढही नाही, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येते. असंघटित कामगारांच्या शोषण आणि पिळवणुकीविरोधात कायदे करण्यात आले.
- रामदास राठोड, कामगार