द्वारका येथे बेवारस बॅगं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2016 12:22 AM2016-06-28T00:22:27+5:302016-06-28T00:22:38+5:30

द्वारका येथे बेवारस बॅगं

Unprofitable Bags at Dwarka | द्वारका येथे बेवारस बॅगं

द्वारका येथे बेवारस बॅगं

Next

नाशिक : द्वारका परिसरातील खरबंदा पार्कमध्ये सोमवारी (दि़२७) दुपारी बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली होती़ या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथक हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले व बॅगेची तपासणी केली़ या बॅगमध्ये कागदपत्रे आढळून आल्याने तसेच बॉम्बसदृश काही आढळून न आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़सोमवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी खरंबदा पार्कमध्ये काळ्या रंगाची बेवासर बॅग असल्याची माहिती सजग नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षास दिली़ त्यांनी त्वरित ही माहिती बॉम्बशोधक नाशक पथकास दिल्याने अवघ्या काही मिनिटांतच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, सहायक पोलीस निरीक्षक तेलोरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले़ त्यांनी या बॅगेची यंत्राद्वारे तपासणी केल्यानंतर या बॅगमध्ये कागदपत्रे आढळून आली़
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती़ मात्र या बॅगेत काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने पोलीस यंत्रणेसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ (प्रतिनिधी)

Web Title: Unprofitable Bags at Dwarka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.