संरक्षक भिंतीअभावी विद्यार्थी असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:09 AM2018-03-24T00:09:50+5:302018-03-24T00:09:50+5:30
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गावच्या वेशीपासून मुख्य रस्त्यालगत असल्याने दररोज येथून दोन चाकी, चार चाकी वाहने यांची मोठी रहदारी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळेला संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे.
मानोरी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गावच्या वेशीपासून मुख्य रस्त्यालगत असल्याने दररोज येथून दोन चाकी, चार चाकी वाहने यांची मोठी रहदारी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळेला संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे.चिमुकल्या मुलांना खेळण्यासाठी जागेची असलेली कमतरता काही प्रमाणात दूर केली आहे. शाळेच्या पूर्व आणि दक्षिण दिशेला गावातील मुख्य रस्ते असल्याने शाळेला संरक्षक भिंतीची गरज असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. सध्या शाळेच्या दोन्ही बाजूने दगड-गोटे आणि काटेरी झुडपे लावून संरक्षण भिंत तयार केली आहे. तरी ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेला संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्यातील मानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सुरु असलेले ििडजटल ,ईिलर्नंग ,रंगरंगोटी चे काम हे अंतिम टप्प्यात आले असून लवकरच इयत्ता पिहली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना ईिलर्नंग द्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेचे इतर काम पूर्णत्वास जात असून निधी अभावी संरक्षण भिंतिचे काम रखडले असून ग्रामपंचायतीने शाळेस संरक्षण भिंत बांधून द्यावी अशी मागणी पालक व ग्रामस्थाकडून होत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्यालगत शाळा असल्याने संरक्षक भिंत तत्काळ होणे गरजेचे आहे. - अगरचंद शिंदे, मुख्याध्यापक, मानोरी बुद्रुक
१४ व्या वित्त आयोगमध्ये सन २०१८-१९ मध्ये मानोरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी तरतूद करण्यात आली असून, ती मंजूर होताच प्राधान्यक्र माने हा प्रश्न त्ववरित मार्गी लावण्यात येईल. - बाळासाहेब कुशारे, ग्रामसेवक, मानोरी बुद्रुक