सातपूरला अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधी कारवाई शांततेत

By admin | Published: November 10, 2016 12:06 AM2016-11-10T00:06:14+5:302016-11-10T00:05:24+5:30

सातपूरला अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधी कारवाई शांततेत

Unrestricted religious sites protest in Satpur | सातपूरला अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधी कारवाई शांततेत

सातपूरला अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधी कारवाई शांततेत

Next

सातपूर : रस्त्यात अडथळा ठरणारी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या दुसऱ्या दिवशी सातपूर विभागातील चार आणि पश्चिम विभागातील तीन अशी एकूण सात धार्मिक स्थळे हटविण्यात आली. कारवाईप्रसंगी फारसा कोणीही विरोध न केल्याने मोहीम शांततेत पार पडली.
न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास मंगळवारपासून प्रारंभ केला आहे. अंबड भागातील चार धार्मिक स्थळे हटविण्यात आल्यानंतर बुधवारी सातपूरला मोहीम राबविण्यात आली. सकाळी सातपूर विभागीय कार्यालयाजवळ मनपा उपआयुक्त रोहिदास बहिरम, सहायक आयुक्त सोमनाथ वाडेकर, राजेंद्र गोसावी आणि अन्य सहा विभागांचे विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपस्थित झाले. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सोनवणे हे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा आल्यानंतर मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. सातपूर येथील राजवाडा, कोळीवाडा, आनंदवली, होरायझन कॉलनी आदि भागातील धार्मिक स्थळे हटविण्यात आली.

Web Title: Unrestricted religious sites protest in Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.