पिंपळगाव बसवंत येथील अस्वच्छ क्वारण्टाइन सेंटर झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 08:45 PM2020-07-14T20:45:21+5:302020-07-14T20:45:34+5:30

पिंपळगाव बसवंत : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी वस्तीगृहातील कॉरण्टाइन सेंटरमध्ये सुविधांची वानवा असल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकल्यानंतर सेंटरमध्ये स्वच्छतेसह विविध सुविधा पुरवत ते चकाचक करण्यात आले आहे.

The unsanitary quarantine center at Pimpalgaon Baswant became shiny | पिंपळगाव बसवंत येथील अस्वच्छ क्वारण्टाइन सेंटर झाले चकाचक

पिंपळगाव बसवंत येथील अस्वच्छ क्वारण्टाइन सेंटर झाले चकाचक

googlenewsNext

पिंपळगाव बसवंत : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी वस्तीगृहातील कॉरण्टाइन सेंटरमध्ये सुविधांची वानवा असल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकल्यानंतर सेंटरमध्ये स्वच्छतेसह विविध सुविधा पुरवत ते चकाचक करण्यात आले आहे. परंतु, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनात अर्धवट शिजवलेले अन्न बेचव असल्याने कोरोना संशयीत रु ग्णांनी प्रशासनाने जेवणाकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्ही येथून पळ काढू , असे आव्हान दिले आहे. जिल्यातील निफाड तालुक्यात कोरोनाने एण्ट्री केल्यानंतर तालुक्यातील पिंपळगाव ,लासलगाव, ओझर, सायखेडा आदी गावांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश झाला. रुग्णांच्या विलगीकरणासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी कॉरण्टाइन सेंटर उभारण्यात आले.
परंतु या कॉरण्टाइन सेंटरमध्ये असुविधांचाच पसारा जास्त असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या ठिकाणी अर्धवट शिजलेले अन्न रु ग्णांना दिले जाते तर स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. शिवाय, परिसरात डासांचे साम्राज्य असल्याने रुग्णांच्या आरोग्यास धोका वाढला होता. सदर वृत्ताची दखल घेत प्रशासनाने अखेर सेंटरमध्ये स्वच्छता करतानाच सोयीसुविधा पुरविल्या आहेत परंतु, अदद्यापही भोजनाचा दर्जा चांगला नसल्याने रुग्णांमध्ये नाराजीचा सूर कायम आहे.
-----------------
कॉरण्टाइन सेंटरमध्ये
रु ग्णांच्या आरोग्याचा विचार करून सात स्वच्छता कर्मचारी नेमले आहेत. जेवणाच्या संदर्भात संबंधित ठेकेदारालाही बजावले आहे. जेवणाची पुन्हा तक्र ार असल्यास त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.
- चेतन काळे,
तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: The unsanitary quarantine center at Pimpalgaon Baswant became shiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक