वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:53 PM2020-05-15T23:53:32+5:302020-05-15T23:53:49+5:30

शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून दुपारी तीन वाजेनंतर ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटत आहे. शुक्रवारी (दि.१५) दुपारी साडेचार वाजेपासून शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटला अन्् विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ७.४ मिलीमीटर इतका पाऊस हवामान निरीक्षण केंद्राकडून नोंदविला गेला.

The unseasonal rains along with the gale force winds | वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले

Next
ठळक मुद्देसिडकोत गारांचा वर्षाव : अर्ध्या तासात ७.४ मिमी पावसाची नोंद

नाशिक : शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून दुपारी तीन वाजेनंतर ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटत आहे. शुक्रवारी (दि.१५) दुपारी साडेचार वाजेपासून शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ हवामानासह वादळी वारा सुटला अन्् विजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ७.४ मिलीमीटर इतका पाऊस हवामान निरीक्षण केंद्राकडून नोंदविला गेला.
दुपारी तीन वाजेपासूनच शहरात ढगाळ हवामान तयार झाल्याने नाशिककरांना उष्माच्या अधिक त्रास जाणवत होता. दुपारी साडेचार वाजेपासून सोसाट्याचा वादळी वारा सुटला. आकाशात विजा चमकू लागल्या अन्् ढगांचा गडगडाटही वाढला. काही वेळेतच शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. मखमलाबाद, मेरी-म्हसरूळ पंचवटी या भागात पावसाचा वेग अधिक राहिला तर सिडकोमध्येही जोरदार पावसासह गारांचा वर्षावही झाला. इंदिरानगर, वडाळा, जुने नाशिक, द्वारका, अशोकामार्ग या भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.
वातावरण थंड झाल्याने दिलासा
मागील चार दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळिशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना संध्याकाळनंतर दिलासा मिळाला.



 

Web Title: The unseasonal rains along with the gale force winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.