नाशिमधील विंचूरमध्ये अवकाळी पाऊस; द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 03:54 PM2022-03-08T15:54:23+5:302022-03-08T15:54:49+5:30
Rain In Nashik : विंचूर येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान सुमारे पंधरा ते वीस मिनिटे बेमोसमी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
नाशिक - विंचूर येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान सुमारे पंधरा ते वीस मिनिटे बेमोसमी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गेली तीन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने द्राक्षांना भाव मिळाला नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी द्राक्षांचे वाळवून मनुके तयार केले. परंतु तेही बेभावात विकावे लागले. तसेच बरेच शेतकऱ्यांना कोरोनामुळे द्राक्षांना भाव मिळाला नाही म्हणून कर्ज झाल्याने बागांवर कुऱ्हाड चालवावी लागली. यावर्षी कोरोनाचे सावट कमी झाल्याने उर्वरित द्राक्ष बागायतदारांना द्राक्षांना भाव मिळेल आणि काहीतरी फायदा होईल, अशी अपेक्षा होती. बागा घेण्यासाठी व्यापाऱ्यांना बोलवावे लागत असल्याने शेतकरी आधीच चिंतेत होते. त्यात भर म्हणून सोमवार झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांसह काढणीला आलेले कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.