नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा फटका; कांदा, गहू, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 02:24 PM2022-03-09T14:24:22+5:302022-03-09T14:25:01+5:30
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते.
येवला (नाशिक):- येवला परिसरात रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यासह विजेचा गडगडाट अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू आणि द्राक्ष पिकांना फटका बसला आहे. तर काढणीला आलेला कांदयाचे नुकसान झाले असून गहू देखील या पाऊसामुळे भुईसपाट झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परत एकदा आस्मानी संकटांचा फटका बळीराजाला बसला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता कुढे मागील पावसापासून सावरत न सावरत परत एकदा ह्या पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला कांद्याला मोठा फटका बसला आहे.तर गहू पिकाला देखील रात्रीच्या पावसामुळे पूर्णपणे पीक जमीनदोस्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे गव्हाचे आव्हरेज देखील या पावसामुळे घटणार आहे.